Delhi News : पुढील 30 वर्षे तुमचा नंबर लागत नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Delhi News : नवी दिल्ली :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शाब्दिक हल्लेखोर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक अत्यंत सणसणीत विधान केले आहे.
1 मिनिट वाचन

Delhi News : दिल्लीतील प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान काँग्रेस नेत्यावर जोरदार निशाणा; आंदोलने आणि निदर्शनांनी काहीही साध्य होणार नाही, शाह स्पष्टच बोलले
Delhi News : नवी दिल्ली :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शाब्दिक हल्लेखोर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक अत्यंत सणसणीत विधान केले आहे. "तुम्ही सध्या परदेशात आहात आणि माझे विधान कदाचित ऐकू शकत नाही, पण पुढील ३० वर्षे तरी देशात तुमचा नंबर लागणार नाही," असा दावा करत शाह यांनी राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय भूमिकेवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. दिल्लीतील 8 हजार 941 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.https://maharashtramirror.com/ Delhi News
"फक्त आंदोलने आणि निदर्शने करून काही साध्य होत नाही"; विरोधकांवर प्रहार
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी काँग्रेस पक्षावर आणि राहुल गांधींवर कडाडून टीका केली. भाजपचे कार्यकर्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वसामान्य जनतेच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. "केवळ निदर्शने आणि आंदोलने करून राजकारण चालत नाही, तुम्ही ज्या भागातून निवडून आला आहात तिथल्या जनतेसाठी प्रत्यक्ष काम करा," असे आवाहन शाह यांनी केले.
30 वर्षांच्या सत्तेवर आणि यमुनेच्या मुद्यावरून काँग्रेसला धारेवर धरले
यावेळी बोलताना शाह यांनी दिल्लीतील यमुना नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस आणि आम आदमी पक्षावरही निशाणा साधला. काँग्रेसने 30 वर्षे दिल्लीत सत्ता भोगली, मात्र यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी काहीही केले नाही, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच संपूर्ण यमुना नदी स्वच्छ करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पंजाब आणि इतर राज्यांमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करत आगामी काळात विरोधी पक्षांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.




