मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार सुनावणी

Delhi News :नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार सुनावणी

Delhi News :नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता, मतदार याद्यांमधील त्रुटी आणि स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन प्रक्रियेवरून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केल्या आहेत. न्यायालयाने या सर्व याचिका एकत्र करून यावर येत्या 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व याचिका स्वीकारताना मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर दोन निवडणूक आयुक्तांनाही प्रतिवादी केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांना या प्रकरणात प्रतिवादी बनवण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
विरोधी पक्षांचे प्रमुख नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, एम. ए. बेबी, डी. राजा, महुआ माझी, सौगत रॉय आणि ई. टी. मोहम्मद बशीर या 11 प्रमुख नेत्यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म 6 बाबत एक अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, त्यांनी फॉर्म 6 बाबत कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. बिहारमध्ये फॉर्म 6 चा असा कोणताही मुद्दा नव्हता किंवा न्यायालयाने सुधारित फॉर्म 6 ला कोणतीही अधिकृत मान्यता दिलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

भेटण्याऐवजी न्यायालयात याचिका दाखल करा'


याआधी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सरन्यायाधीश यांची भेट घेण्याची वेळ मागितली होती. मात्र, अधिकार श्रेणी आणि घटनात्मक मर्यादांचा हवाला देत सरन्यायाधीशांनी नेत्यांना भेटण्यास नकार दिला. 'थेट भेटण्याऐवजी न्यायालयात अधिकृत याचिका दाखल करा' असा सल्ला सरन्यायाधीशांनी राहुल गांधी यांना दिला होता. त्यानुसार राहुल गांधींच्या लीगल टीमने सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये अधिकृतपणे याचिका दाखल केली असून त्याला डायरी नंबरही प्राप्त झाला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा