मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार 28 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बांधावर

Mumbai News : मुंबई : राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार 28 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बांधावर
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार 28 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बांधावर


Mumbai News : मुंबई :
राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहे https://maharashtramirror.com/ Mumbai News

राज्य सरकारने 5 ऑक्टोबरपासून पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्ष नुकसान झाल्यानंतर पंचनामे, त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया आणि मदत मिळण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी भागाचा प्रत्यक्ष दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 28 सप्टेंबरपासून शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

याशिवाय औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता राज्यातील गंभीर परिस्थितीचा विचार करून तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी भूमिका पवार यांनी मांडली होती. प्रत्येक जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि पशुधनाची परिस्थिती यावर दररोज लक्ष ठेवण्यासाठी राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

रोहित पवारांकडून पाहणीला सुरुवात
शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणीला सुरुवात केली आहे. त्यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. धाराशिवनंतर त्यांनी बीड आणि लातूर जिल्ह्यांतील परिस्थितीचीही पाहणी केली.

रोहित पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 50 हजार रुपये, तर शेतमजूर कुटुंबांना 25 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पाहणीदरम्यान रोहित पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. “आज दिवंगत अजित पवार असते तर ते नियम आणि अटींमध्ये अडकले नसते. ते जनतेसाठी काम करणारे नेतृत्व होते. जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणीव होती. मात्र, आज महायुतीतील नेत्यांना जनतेच्या प्रश्नांचे देणे-घेणे नाही,” असा आरोप त्यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या दौऱ्याकडे तसेच सरकारकडून होणाऱ्या पंचनामे आणि मदतीच्या प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा