मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारांची तिसरी यादी, सातारा आणि रावेरमधून कोणाला तिकीट ?

Sharad Pawar NCP Loksabha Candidate List : शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sharad Pawar

Sharad Pawar NCP Loksabha Candidate List : शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत त्यांनी रावेर आणि सातारा येथून उमेदवार उभे केले आहेत.

मुंबई :- शरद पवार Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Election उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतील दोन नावे शरद पवार यांनी जाहीर केली आहेत. सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. NCP Sharad Pawar Candidates List 

काल महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार Sharad Pawar यांनी ही यादी जाहीर केली आहे. काल महखविकास आघाडीने जागावाटपाबाबत पत्रकार परिषद बोलावली होती ज्यात शिवसेना, ठाकरे गटाने, शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस किती जागा लढवणार याचे चित्र स्पष्ट करण्यात आले होते. याआधीही शरद पवार यांनी दोन याद्या जाहीर केल्या होत्या आणि आज शरद पवार यांनी उर्वरित जागांवर उमेदवार उभे केले आहेत. NCP Sharad Pawar Candidates List 

महाविकास आघाडी मध्ये बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) 21 जागांवर, काँग्रेस 17 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 10 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत महाराष्ट्रातल्या पाच टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी केल्यामुळे अनेक आठवड्यांच्या वाटाघाटींनंतर अंतिम निर्णय झाला आहे. वादग्रस्त सांगली आणि भिवंडीच्या जागांवर काँग्रेसने आपला दावा सोडल्या आहे. NCP Sharad Pawar Candidates List 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले की पक्षाने आपल्या मित्रपक्षांना शरण आलेले नाही, परंतु एक धोरणात्मक पाऊल मागे घेतले आहे आणि चर्चा अनिश्चित काळासाठी सुरू ठेवू शकत नाही यावर जोर दिला. सांगली आणि भिवंडीसारख्या जागा वाटपावरून आणि मुंबईतील सहा पैकी चार जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेला दिल्या जाण्यावरून काँग्रेसच्या प्रदेश युनिटमध्ये काही असंतोष असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले आहे.

शेअर करा