मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar : 40 वर्षांची साथ संपली! शरद पवारांचे निष्ठावान सहकारी अरुण गुजराती अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Arun Gujarathi Joined Ajit Pawar Party : माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांचा कार्यकर्त्यांसाठी भावनिक निर्णय; चोपड्यात अजित पवार गटाला मोठी बळकटी

V
Vivek

2 मिनिट वाचन

Sharad Pawar : 40 वर्षांची साथ संपली! शरद पवारांचे निष्ठावान सहकारी अरुण गुजराती अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Arun Gujarathi Joined Ajit Pawar Party : माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांचा कार्यकर्त्यांसाठी भावनिक निर्णय; चोपड्यात अजित पवार गटाला मोठी बळकटी

मुंबई :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतरांचा हंगाम पुन्हा सुरू झाला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शरद पवार यांचे चार दशकांपासूनचे जिवलग सहकारी आणि ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांनी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज (मंगळवार) संध्याकाळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

40 वर्षांची साथ सोडताना भावनिक: अरुण गुजराती हे शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार मानले जात होते. काँग्रेस पक्षातून त्यांनी शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केली आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षाशी जोडले होते. आज सकाळी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि या राजकीय प्रवासाचा शेवट केला.

यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली

"शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला. ज्यांनी मला मोठं केलं ते शरद पवार आणि ज्यांनी मला पुढे आणलं ते माझे कार्यकर्ते. दोघांच्या मध्ये मी सँडविच झालो होतो. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला," असे गुजराती म्हणाले.

कार्यकर्त्यांचा दबाव निर्णायक ठरला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर चोपड्यात अरुण गुजराती यांच्या समर्थकांमध्ये मोठी फूट पडली होती. "अजित पवार यांच्यासोबत गेले तर तुमच्यासोबत राहू, नाहीतर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे," असा कार्यकर्त्यांचा दबाव आल्यानंतर गुजराती यांना अखेर हा कठीण निर्णय घ्यावा लागला.

राजकीय परिणाम

अरुण गुजराती यांनी मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले आहे. चोपडा मतदारसंघात त्यांची संघटनात्मक पकड मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे अजित पवार गटाला स्थानिक स्तरावर, विशेषतः चोपडा परिसरात मोठी बळकटी मिळणार आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने अजित पवार गटासाठी हा एक 'प्रतिष्ठेचा' राजकीय प्रवेश मानला जात आहे.

या प्रवेशानंतर चोपडा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेअर करा