मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ओतूरमध्ये ज्येष्ठ शेतकऱ्याची सव्वा लाखांची फसवणूक; एटीएममध्ये ‘मदत’ करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलले

पुणे: एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ७२ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून, हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून खात्यातून १ लाख ५५ हजार रुपये लंपास केल्याची घटना ओतूर येथे घडली आहे.

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

ओतूरमध्ये ज्येष्ठ शेतकऱ्याची सव्वा लाखांची फसवणूक; एटीएममध्ये ‘मदत’ करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलले

पुणे: एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ७२ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून, हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून खात्यातून १ लाख ५५ हजार रुपये लंपास केल्याची घटना ओतूर येथे घडली आहे. ‘मदत करतो’ असे सांगून दोन अनोळखी भामट्यांनी ही फसवणूक केली असून, याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळशिराम विष्णू कुलवडे (वय ७२, धंदा शेती, रा. उदापूर, कुलवडे मळा, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. ही घटना १२ एप्रिल २०२६ रोजी ओतूर येथील ब्राह्मणवाडा चौकातील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एटीएममध्ये घडली होती.

असा बसला फटका
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळशिराम कुलवडे हे १२ एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ब्राह्मणवाडा चौकातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे दोन तरुण आले. कुलवडे यांना पैसे काढण्यात अडचण येत असल्याचे पाहून, आरोपींनी “आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो,” असे म्हणत त्यांचा विश्वास संपादन केला.

हातचलाखीने कार्ड बदलले
पैसे काढून देण्याच्या बहाण्याने आरोपींनी कुलवडे यांच्या एटीएमचा पासवर्ड चोरून पाहिला. त्यानंतर अत्यंत शिताफीने त्यांचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेऊन त्यांना दुसरेच बनावट कार्ड परत दिले. कुलवडे यांना हा प्रकार लक्षात आला नाही. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या खात्यातून वेळोवेळी १ लाख ५५ हजार रुपये काढून घेतले. आपल्या खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुलवडे यांनी सोमवारी (ता. ४) ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
ओतूर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. पोलीस हवालदार सापटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा