मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कात्रज येथे गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला १३ लाखांचा गंडा

एमएनजीएल बिल भरण्यासाठी एक एपीके फाईल पाठवण्यात आली होती

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

कात्रज येथे गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला १३ लाखांचा गंडा

एमएनजीएल बिल भरण्यासाठी एक एपीके फाईल पाठवण्यात आली होती

पुणे: घरगुती गॅसचे बिल भरण्यासाठी मोबाईलवर पाठवलेली एक संचिका (लिंक) डाऊनलोड करणे कात्रजमधील एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी या संचिकेच्या माध्यमातून मोबाईलचा ताबा मिळवून फिर्यादीच्या बँक खात्यातून १३ लाख ६२ हजार ३५१ रुपये लंपास केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ, कात्रज परिसरात राहणाऱ्या एका ६९ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारक, युपीआय आयडी वापरकर्ते आणि बँक खाते धारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२), ३ (५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

अशी झाली फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत ही फसवणूक झाली. फिर्यादी यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून संदेश आला होता. त्यामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) बिल भरण्यासाठी एक अ‍ॅप्लिकेशनची फाईल (एपीके फाईल) पाठवण्यात आली होती. गॅस पुरवठा खंडित होईल, अशी भीती दाखवून ती फाईल डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले.

मोबाईलचा ताबा मिळवून मारला डल्ला
फिर्यादीच्या पत्नीने ती फाईल डाऊनलोड करताच, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला. या तांत्रिक प्रवेशाद्वारे चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न मिळता टप्प्याटप्प्याने फिर्यादीच्या खात्यातून १३ लाख ६२ हजार ३५१ रुपये अन्य बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग करत आहेत. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही संचिका (फाईल्स) डाऊनलोड करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शेअर करा