मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

गहुंजेतील उच्चभ्रू सोसायटीत घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

संशयित फिर्यादी महिलेला शोधत होते मात्र ती न मिळाल्याने तिच्या वडिलांना मारहाण

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

गहुंजेतील उच्चभ्रू सोसायटीत घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

संशयित फिर्यादी महिलेला शोधत होते मात्र ती न मिळाल्याने तिच्या वडिलांना मारहाण

पिंपरी: गहुंजे येथील लोढा बेलमेडो सोसायटीतील फ्लॅटमध्ये घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत धमकी दिली. आरोपी फिर्यादी महिलेला शोधण्यासाठी आले होते. मात्र ती न मिळाल्याने तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (२४ मे) रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास घडली.

कुणाल कुमार (३५), सुरभी सिन्हा (३४), शांतनु शेखर (३३) आणि श्वेताभ कुमार (२४, सर्व रा. बाणेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला फिर्यादीने शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मध्यरात्री लोढा बेलमेडो सोसायटीतील फ्लॅटमध्ये जबरदस्तीने घुसले. फिर्यादी महिला घरी नसल्याचे लक्षात येताच आरोपी संतापले. आरोपी कुणाल कुमार याने फिर्यादीचे वडील रवींद्र चौबे यांच्या कानशिलात बुक्के मारले. तसेच अन्य आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

शेअर करा