मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Shirsat : "ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत" — मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

•विट्स हॉटेल प्रकरणानंतर आयकर खात्याची कारवाई, शिरसाट यांची जाहीर कबुली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Shirsat

•विट्स हॉटेल प्रकरणानंतर आयकर खात्याची कारवाई, शिरसाट यांची जाहीर कबुली

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. विट्स हॉटेलच्या वादग्रस्त लिलाव प्रकरणानंतर आता त्यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाली असून, खुद्द शिरसाट यांनीच याची जाहीर कबुली दिली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या आर्थिक व्यवहारांची झाडाझडती होणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना शिरसाट यांनी सांगितले की, "आता काळा पैसा चालणार नाही. हे मी स्वतःलाही सांगतोय. 2019 आणि 2024 मधील संपत्तीतील फरकावर खुलासा मागण्यात आला आहे." 9 जुलै रोजी आयकर खात्याकडे खुलासा सादर करावा लागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या प्रकरणाला मूळ आहे विट्स हॉटेलचा वाद. विरोधकांनी केलेल्या आरोपांनुसार, बाजारभावाने 110 कोटी रुपये असलेलं हॉटेल शिरसाट यांच्या मुलाने फक्त 67 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप झाला होता. या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर करताना शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं होतं, पण विरोधकांनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनातही लावून धरला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. आता आयकर विभागाची नोटीस ही त्या चौकशीच्या पुढची पायरी मानली जात आहे. सत्ताधारी गटातील मंत्र्याविरोधात अशा प्रकारची तपास यंत्रणांची सक्रीय कारवाई ही दुर्मीळ घटना मानली जात असून, यामुळे महायुतीतील अंतर्गत ताणतणावही चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : मुंबई महापालिकेत 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' ऐवजी 'ठाकरे + ठाकरे' युती?

शेअर करा