मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : मुंबई महापालिकेत 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' ऐवजी 'ठाकरे + ठाकरे' युती?

•मनसे-शिवसेना युतीसाठी महाविकास आघाडीत तातडीचा निर्णय?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics : मुंबई महापालिकेत 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' ऐवजी 'ठाकरे + ठाकरे' युती?

•मनसे-शिवसेना युतीसाठी महाविकास आघाडीत तातडीचा निर्णय? काँग्रेसने घेतली सावध भूमिका

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या दोन ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या संदर्भात हालचाली वेग घेत आहेत.

अलीकडेच मुंबईत एका व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या राज ठाकरेंना युतीचं आवाहन केलं. राज ठाकरे यांनी यावर थेट प्रतिसाद दिला नसला तरी, संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे या युतीच्या चर्चेला अधिक अधिक उधाण आलं आहे. राऊत म्हणाले, "महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र समीकरणं असतात, आणि जनतेचा दबाव हा उद्धव-राज एकत्र येण्याच्या बाजूने आहे."

दुसरीकडे, काँग्रेसकडून यावर सावध पवित्रा घेतला गेला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितले की, "स्थानिक निवडणुकांबाबतचे निर्णय स्थानिक नेतृत्व घेते आणि अंतिम निर्णय हायकमांडच घेणार आहे. सध्या आम्ही स्वबळावर तयारी करत आहोत."

संजय राऊत यांनीही स्पष्ट केलं की, "महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नाहीत. महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक स्वरूपाच्या आघाड्याच प्रभावी ठरतात." त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेमध्ये आगामी निवडणुकीपूर्वी युती होते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा: Guru Purnima : गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

शेअर करा