खासदार संजय राऊत यांच्या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, पत्रातून "याची" केली मागणी
Sanjay Raut Wrote A Letter To PM Modi To Enquiry Shrikant Shinde : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांचे पुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या चॅरिटेबल ट्रस्टची चौकशी केली मागणी
1 मिनिट वाचन

Sanjay Raut Wrote A Letter To PM Modi To Enquiry Shrikant Shinde : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांचे पुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या चॅरिटेबल ट्रस्टची चौकशी केली मागणी
मुंबई :- श्रीकांत शिंदे Shrikant Shinde फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Wrote A letter PM Modi यांना पत्र लिहिले आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशन Shrikant Shinde Foundation अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा स्रोत नेमकं काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या चौकशीची मागणी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? ही माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे असे राऊतांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच धर्मदाय आयुक्त या संदर्भात चौकशी करावी, अशा प्रकारची तक्रार वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्त्यांकडे केली आहे. मात्र एक महिना उलटूनही या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.
संजय राऊतांची पंतप्रधानांकडे पत्राद्ववारे मागणी यासंदर्भातील पत्र संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे, "चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यातदेखील सुरू आहे. त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत. पैसै देणारे कोण आहेत", असा सवाल कॅप्शनमध्ये राऊतांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राऊतांच्या या मागणीमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
छायाचित्रे · 1/2
Arrow Keys ⟵ ⟶
खासदार संजय राऊतांचे पत्र जशास तसे…
मा. प्रधानमंत्रीजी, विषयः श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याबाबत. महोदय, देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या १० वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आश्वासन दिले. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली 'पांढरा करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे. सदर फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील श्री. नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असे दिसते. महाराष्ट्राला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. अनेक समाजसेवकांनी प्रसंगी पदरमोड करून संस्थात्मक कार्य केले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाउंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोटधवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अनेक गरजूंना रोख स्वरूपातदेखील मदत करते. मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यासाठी भव्य मंडप, देखावे, रोषणाई, कलाकारांचे संच ज्यांचा मेहनताना कोट्यवधीचा आहे. त्यांना बिदागीच्या रकमा कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या? त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वैद्यकीय उपक्रम घेते. वैद्यकय मोफत उपचार करते असे सांगितले गेले. ते उपक्रम नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत, पण याबाबत ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय? ते तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी देणग्या दिल्या ते …




