मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : 'हा सामना फिक्सिंग होता, 25 हजार कोटी पाकिस्तानात गेले'; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

Sanjay Raut On Asia Cup Match : 'पहलगाम हल्ल्याला काही महिने झाले नाहीत, तरीही सामना खेळला', राऊत आक्रमक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut

Sanjay Raut On Asia Cup Match : 'पहलगाम हल्ल्याला काही महिने झाले नाहीत, तरीही सामना खेळला', राऊत आक्रमक

मुंबई :- आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भारत-पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता," असा गंभीर आरोप करत, या सामन्यानंतर तब्बल २५ हजार कोटी रुपये पाकिस्तानात गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा पैसा भारतविरोधी कारवायांसाठी वापरला जाईल, असेही राऊत यांनी म्हटले.

'सरकारने संधी असताना माघार घेतली'

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "ज्या पाकिस्तानला कर्ज मिळू नये, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, त्यालाच तुम्ही सामन्यातून पैसा कमावून दिला. संधी असताना भाजपने माघार घेतली. कालच्या सामन्यात दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला. सामना खेळून भारताने नाचक्की करून घेतली आहे."

राऊत यांनी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या विधानाचाही उल्लेख केला. "संघाची इच्छा नसतानाही हा सामना खेळवण्यात आला," असे गावस्कर यांनी म्हटले होते. यावरूनच राऊत यांनी सरकारवर दबावाचा आरोप केला.

एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका

यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले. "एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणे बंद करावे. तुम्ही शेक हँड केले नसल्याचे सांगितले जात आहे, पण तुम्ही सामना तर खेळला ना?" असा सवाल त्यांनी केला.

आक्रमक भूमिका कायम

पहलगाम हल्ल्याला काही महिने झाले नाहीत, तोवरच अशा प्रकारचा क्रिकेट सामना खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. शिवसेना (उबाठा गट) ने काल राज्यभरात या सामन्याला विरोध करत आंदोलने केली. पहलगाम हल्ल्यात अनेक भारतीय सैनिकांनी प्राण गमावले असताना, अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, अशी भूमिका राऊत यांनी घेतली.

शेअर करा