मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : "निवडणूक चोरली गेली!" – संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

•"लाडकी बहीणच्या आडून भाजपने विधानसभा निवडणूक हायजॅक केली"

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut: "BJP is 'D Gang'! - Sanjay Raut's explosive attack"

•"लाडकी बहीणच्या आडून भाजपने विधानसभा निवडणूक हायजॅक केली"

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपने "चोरली, लुटली आणि दरोडा घातला" असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपवर केलेल्या आरोपाचे समर्थन करत राऊत यांनी भाजप, पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

"राहुल गांधी यांनी जे म्हटले ते आम्ही पूर्वीपासूनच सांगत होतो. ही निवडणूक हायजॅक झाली. 'लाडकी बहीण' या योजनेच्या आडून भाजपने निवडणूक अपहृत केली," असा ठपका राऊतांनी ठेवला. त्यांनी असा सवालही उपस्थित केला की, "लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला, आणि सहा महिन्यांत काय घडले की भाजपला एकतर्फी विजय मिळाला?"

राऊत पुढे म्हणाले, "ते 25 जागाही जिंकू शकत नव्हते. निवडणूक आयोगासारख्या संस्थांचा गैरवापर झाला आहे. मोदी-शाह-फडणवीस या त्रिकुटाने लोकशाहीला गळा घातला आहे. खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार दिला गेला पाहिजे, तर तो भाजपनेत्यांनाच मिळायला हवा!"

एकनाथ शिंदेंबाबतही खुलासा
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. "शिंदे माझे जुने मित्र होते. बंड करताना ते खूप घाबरले होते. मला म्हणाले, 'माझं तुरुंगात जायचं वय नाही', पण मी त्यांना म्हटलं – 'माझंही नातवंडं आहेत, पण पक्षाच्या छातीवर पाय ठेवून जाणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी आहे'," असं ते म्हणाले.

"ते डरपोक होते म्हणून गेले. आम्ही गेलो असतो, तर शिवसेना उरलीच नसती. पण आम्ही राहिलो आणि आजही बाळासाहेबांच्या विचारांवर ठाम आहोत," असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं

हेही वाचा: Mumbai Local Accident : मुंबई लोकलचा भीषण अपघात: पुष्पक एक्स्प्रेसला घासून 5 प्रवाशांचा मृत्यू!

शेअर करा