मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Local Accident : मुंबई लोकलचा भीषण अपघात: पुष्पक एक्स्प्रेसला घासून 5 प्रवाशांचा मृत्यू!

•Mumbai Local And Pushpak Train Accident : दिवा–मुंब्रा दरम्यान घडली दुर्घटना,आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या दारात उभे असलेले प्रवासी थेट रूळावर पडून मृत्यू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Local Accident : मुंबई लोकलचा भीषण अपघात: पुष्पक एक्स्प्रेसला घासून 5 प्रवाशांचा मृत्यू!

•Mumbai Local And Pushpak Train Accident : दिवा–मुंब्रा दरम्यान घडली दुर्घटना,आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या दारात उभे असलेले प्रवासी थेट रूळावर पडून मृत्यू

ठाणे :- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सकाळच्या गर्दीच्या वेळेस मुंबईतील लोकल सेवेवर मोठा धक्का बसला आहे. मध्य रेल्वेच्या कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलने आणि दुसऱ्या पटरीवरून जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान जोरदार घासले. या भीषण धडकेत लोकलच्या दरवाज्याशी लटकलेल्या सुमारे 8 ते 10 प्रवासी धावत्या गाडीतून थेट पटरीवर फेकले गेले.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. दुर्घटना सकाळी 9 ते 9.15 च्या सुमारास घडली, जेव्हा गर्दी शिगेला पोहोचलेली असते.

हादरलेले मुंबईकर आणि अपुऱ्या लोकल फेऱ्यांमुळे नागरिक 'मिळेल ती ट्रेन' पकडत असतात, याचा गंभीर परिणाम आज पाहायला मिळाला. अपघातानंतर काही काळासाठी या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, प्रथमदर्शनी ट्रॅक मॅनेजमेंट आणि सिग्नल यंत्रणेतील चूक समोर येत आहे.

हेही वाचा: Navi Mumbai News : नेरुळ पोलिसांची जबरदस्त कामगिरी! 83 चोरीचे मोबाईल हस्तगत, मूळ मालकांच्या हाती सोपवले

शेअर करा