मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : नेपाळमधील हिंसाचारावरून संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा; 'ही परिस्थिती कुठेही उद्भवू शकते, सावधान!'

Sanjay Raut On Devendra Fadnavis : 'अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारले,' राऊतांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केली भीती

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut : नेपाळमधील हिंसाचारावरून संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा; 'ही परिस्थिती कुठेही उद्भवू शकते, सावधान!'

Sanjay Raut On Devendra Fadnavis : 'अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारले,' राऊतांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केली भीती

मुंबई :- भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावरून आता भारतीय राजकारणातही चर्चा सुरू झाली आहे. नेपाळमधील वाढता जनआक्रोश आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील आंदोलनावर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी एक सूचक टिप्पणी केली आहे. त्यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट टॅग करून 'भारताला सावध' राहण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राऊतांचे सूचक ट्विट

नेपाळमधील हिंसाचाराचा एक व्हिडिओ शेअर करत राऊत यांनी म्हटले आहे की, "ही परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते. सावध व्हा. भारत माता की जय, वंदे मातरम!" या व्हिडिओमध्ये नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलक पळवून पळवून मारत असल्याचा दावा करण्यात आला आहे. राऊत यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी, भाजप आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनाही टॅग केले आहे, ज्यामुळे त्यांच्या टीकेचा रोख थेट केंद्र सरकारवर असल्याचे दिसून येते.

नेपाळमध्ये नेमके काय घडत आहे?

गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सरकारविरोधात तीव्र जनआंदोलन सुरू आहे. सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले. आंदोलकांनी संसद, शासकीय इमारती आणि माजी नेत्यांच्या घरांना लक्ष्य केले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत जवळपास 20 आंदोलक तरुण ठार झाल्याची माहिती आहे. वाढत्या जनआक्रोशासमोर नमते घेत नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या शेजारी देशांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र असंतोष पसरल्याचे चित्र अलीकडच्या काळात दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी केलेल्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.

शेअर करा