मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील हल्ल्याबाबत संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप

Anil Deshmukh attack Sanjay Raut's allegations against Devendra Fadnavis: शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut

Anil Deshmukh attack Sanjay Raut's allegations against Devendra Fadnavis:  शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.

मुंबई :- शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था संपुष्टात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात माजी गृहमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगानंतर या हल्ल्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा स्टंट असल्याचा आरोप करत आहे. मात्र आम्हाला नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे स्टंट करण्याची आवश्यकता नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

देशमुखांचे चिरंजीव निवडून येत आहेत. त्यामुळेच हल्ला झाला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ही भारतीय जनता पक्षाची नौटंकी असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी गृहमंत्र्यांवर हल्ले व्हावे, असे वातावरण आजपर्यंत महाराष्ट्रात नव्हते. हेच आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या काळात झाले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे

राज ठाकरेंबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्यावर शिवसेना सोडण्याची वेळ आली आहे, कधी ते भाजपची स्क्रिप्ट वाचतात, कधी शिंदे यांची स्क्रिप्ट वाचतात. राज ठाकरे हे गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्क्रिप्ट वाचत आहेत. ते कधी नारायण राणे कधी देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्ट वाचत असतात. शिवसेनेच्या बाबतीत त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र फार गंभीर्याने घेतोय, असे दिसत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

शेअर करा