मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : "नंदनवन बेईमानीतून निर्माण झालंय!"; राज ठाकरे-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut On Eknath Shinde : ठाकरे बंधूंच्या युतीतील दुराव्यानंतर राऊतांची तिखट प्रतिक्रिया; 'बेईमानी' आणि 'खंजीर' शब्दांचा वापर करत शिंदेंवर निशाणा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut

Sanjay Raut On Eknath Shinde : ठाकरे बंधूंच्या युतीतील दुराव्यानंतर राऊतांची तिखट प्रतिक्रिया; 'बेईमानी' आणि 'खंजीर' शब्दांचा वापर करत शिंदेंवर निशाणा

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यात काल 'नंदनवन' बंगल्यावर झालेली भेट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीवर शिवसेना (ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अत्यंत जहाल शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. "एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असून हे नंदनवन बेईमानीतून उभे राहिले आहे," असा घणाघाती आरोप राऊतांनी आज केला.

आम्ही हेरगिरी करत नाही - संजय राऊत

नेहमीप्रमाणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "कोण कोणाला भेटतं यावर आमचे बंधन नाही आणि आम्ही त्याची हेरगिरीही करत नाही. हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंनाच विचारावा. मात्र, आमचे भांडण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीशी आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली आहे आणि त्यामागे मोदी-शाहांचा विचार आहे."

भेटीमागचे नेमके गणित काय?

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच भेट होती. या भेटीत प्रामुख्याने कल्याण-डोंबिवली (KDMC) निवडणुकीच्या निकालांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

शिंदेंनी मानले आभार
कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेसेनेला पाठिंबा देऊन सत्तेचा मार्ग मोकळा केला, त्याबद्दल एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानले.

सहकार्याचे आश्वासन: राज ठाकरे यांनीही महापालिका सभागृहाच्या कामकाजात मनसेचे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन एकनाथ शिंदेंना दिल्याचे समजते.

ठाकरे बंधूंच्या युतीला तडा?

गेल्या वर्षी राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली होती, मात्र महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मनसेने शिंदेंना दिलेली साथ आणि आता झालेली ही भेट यामुळे ही युती धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. संजय राऊत यांच्या विधानामुळे ठाकरे गटाने आता राज ठाकरेंच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे.

शेअर करा