मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : "मुंबईत फक्त 'जय महाराष्ट्र'च चालणार!"; महापौर पदावरून संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा; भागवतांनाही सुनावले खडेबोल

Sanjay Raut On BJP : "हे लफंगे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?" राऊतांचा सवाल; मुंबईचा महापौर मराठीच होणार या भूमिकेवर शिवसेना (UBT) ठाम!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut: "BJP is 'D Gang'! - Sanjay Raut's explosive attack"

Sanjay Raut On BJP : "हे लफंगे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?" राऊतांचा सवाल; मुंबईचा महापौर मराठीच होणार या भूमिकेवर शिवसेना (UBT) ठाम!

मुंबई | मुंबई महानगरपालिकेचा Mumbai BMC Election आगामी महापौर कोण होणार? या प्रश्नावरून राजकीय वातावरण पेटले असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या 'हिंदू महापौर' कार्डावर जोरदार प्रहार केला आहे. "मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि इथे फक्त 'जय महाराष्ट्र'च चालणार," अशा शब्दांत राऊत यांनी भाजपच्या रणनीतीला उत्तर दिले आहे.

"आम्हाला हिंदुत्व शिकवू नका!"

भाजपकडून मुंबईचा महापौर 'हिंदू' होईल, असे सांगण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर राऊत भडकले. ते म्हणाले, "हे लफंगे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? बाळासाहेब ठाकरेंनी याच मुंबईतून हिंदुत्वाचा लढा सुरू केला, हे विसरू नका. आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे. 'जय श्रीराम' आमच्या हृदयात आहेच, पण मुंबईत 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'जय महाराष्ट्र' हाच नारा चालणार. उगाच वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका."

'मराठी' अस्मितेचा पुनरुच्चार

राऊत यांनी ऐतिहासिक दाखले देत मुंबईच्या मराठी अस्मितेवर भर दिला. "छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, पण ते मराठी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले, ते मराठी होते. मग मुंबईचा महापौर मराठी का नसावा?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृपाशंकर सिंह यांच्या 'उत्तर भारतीय महापौरा'च्या विधानानंतर राऊत यांनी ही भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली आहे.

स्टार प्रचारक आणि 'मुंबई वाचवा'ची हाक

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरवण्याच्या निर्णयावरही राऊतांनी टीका केली. "बाहेरून लोक मुंबईत येऊन ती विकण्याचा आणि तिचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक केवळ महापालिकेची नाही, तर 'मुंबई वाचवण्यासाठी' चाललेली लढाई आहे," असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

सरसंघचालकांनाही टोला

सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जिथे राहता तिथली भाषा शिका' असे विधान केले होते. त्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, "भागवत म्हणतात ते बरोबर आहे, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असूनही ते नेहमी हिंदीतच का बोलतात? त्यांनी स्वतःही मराठीत बोलले पाहिजे आणि संघाचा सर्व कारभार मराठीतूनच चालवला पाहिजे."

शेअर करा