मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : "मी मरेपर्यंत शिवसैनिकच!"; संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंशी असलेल्या मतभेदांच्या चर्चा उडवून लावल्या

Sanjay Raut Latest News : 2029 ला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत हीच इच्छा; 'बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक' म्हणत राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

V
Vivek

2 मिनिट वाचन

Sanjay Raut: "BJP is 'D Gang'! - Sanjay Raut's explosive attack"

Sanjay Raut Latest News : 2029 ला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत हीच इच्छा; 'बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक' म्हणत राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई :- शिवसेना (ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात टोकाचे मतभेद असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेषतः राज्यसभेच्या जागावाटपावरून पक्षात दोन गट पडल्याचे बोलले जात होते. मात्र, आज संजय राऊत यांनी या सर्व चर्चांचा सडेतोड शब्दांत समाचार घेतला. "माझ्यात आणि आदित्य ठाकरेंमध्ये कसले मतभेद असणार? या निव्वळ सुरस बातम्या आहेत," असे म्हणत त्यांनी अंतर्गत वादावर पडदा टाकला.

"मी जन्मापासून शिवसैनिक, खासदार व्हायला आलो नाही"

आदित्य ठाकरेंसोबतच्या वादावर बोलताना राऊत म्हणाले की, "ज्या बैठकीचा संदर्भ दिला जात आहे, त्या बैठकीला मी उपस्थितच नव्हतो. मी माझ्या पुस्तकाच्या कामासाठी दिल्लीत होतो. मी या पक्षात खासदार व्हायला आलो नाही, तर बाळासाहेबांचे विचार पोहोचवणारा एक सामान्य सैनिक म्हणून काम करत आहे. मी माझे मत परखडपणे मांडतो, हाच माझा दोष असेल तर तो मला मान्य आहे."

2029 ला मुख्यमंत्री कोण? राऊतांचे सूचक विधान

2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री असतील का? या प्रश्नावर राऊतांनी स्पष्ट केले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री का नसतील? आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. सध्या पक्षावर जे फोडाफोडीचे संकट आहे, ते रोखून एक मजबूत संघटन उभे करणे ही आमची प्राथमिकता आहे. सत्ता शिवसेनेकडे यावी आणि नेतृत्व उद्धव ठाकरेंनी करावे, हीच माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे."

"पक्ष सोडण्याचा विचार मनाला शिवलाही नाही"

संजय राऊत लवकरच शिवसेना सोडणार, अशा अफवा पसरवणाऱ्यांना त्यांनी कडक उत्तर दिले. "मी या पक्षासाठी घाम गाळला आहे, रक्त सांडले आहे. पक्ष सोडण्याचा विचार माझ्या मनाला कधी शिवलाही नाही आणि भविष्यातही तसे घडणार नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले.

बुवाबाजीला मंत्र्यांकडूनच प्रतिष्ठा; खरात प्रकरणावर प्रहार

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. "अशोक खरातसारख्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. मुळात अशा बुवाबाजीला प्रतिष्ठा सामान्य माणूस नाही, तर सत्ताधारी आणि मंत्री देतात. त्यांच्या जाण्या-येण्यामुळेच अशा बुवांचे महत्त्व वाढते," असा टोला त्यांनी लगावला.

शेअर करा