मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : 'निवडणूक आयोग दुतोंडी गांडुळ'; संजय राऊतांची दिल्लीतील मोर्च्यापूर्वी सडकून टीका

Sanjay Raut On EC : 'भाजपच्या हस्तकासारखे काम करत आहे आयोग'; देवेंद्र फडणवीस 'चोरीच्या मालाचे लाभार्थी' असल्याचा आरोप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut

Sanjay Raut On EC : 'भाजपच्या हस्तकासारखे काम करत आहे आयोग'; देवेंद्र फडणवीस 'चोरीच्या मालाचे लाभार्थी' असल्याचा आरोप

मुंबई :- महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनासोबतच दिल्लीतील निवडणूक आयोगावरील मोर्च्याला शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर 'दुतोंडी गांडुळ' असल्याचा आरोप करत सरकारवरही निशाणा साधला.

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

आज देशभरात दोन मोठी आंदोलने होत आहेत. महाराष्ट्रात सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन तर दिल्लीत 'इंडिया' आघाडीकडून निवडणुकीतील मतचोरीच्या आरोपांवरून निवडणूक आयोगावर मोर्चा काढला जात आहे. या दोन्ही आंदोलनांवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, "निवडणूक आयोग पूर्णपणे सरकारचे हस्तक म्हणून काम करत आहे. महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यांतील घोटाळे आणि ईव्हीएमसंदर्भातील प्रश्नांवर निवडणूक आयोग दुर्लक्ष करत आहे."

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. 'निवडणूक आयोगाचे जे कोणी लाभार्थी आहेत, त्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहेत,' असे म्हणत राऊत यांनी फडणवीस यांना 'दरोड्याचे लाभार्थी' संबोधले. "ज्यांनी चोरी केली आहे, त्यांनी गप्प राहिले पाहिजे," अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना लक्ष्य केले. निवडणूक आयोगावर त्यांचा स्वतःचा विश्वास नसल्याचे सांगत 'शिवसेना' हे नाव आणि चिन्ह कसे दुसऱ्या चोरांच्या हातात दिले, हे आम्ही पाहिले आहे, असे राऊत म्हणाले.

या आंदोलनांदरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्यास 'आम्हाला अटक करून आत टाकले तरी चालेल, आमची तयारी आहे,' असा इशाराही राऊत यांनी दिला. दोन्ही आंदोलनांनी आजचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शेअर करा