मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : "एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत"; संजय राऊतांचे भाकीत, न्यायव्यवस्थेवरही केली जहरी टीका

Sanjay Raut On Eknath Shinde : अजित पवारांच्या पक्ष सोडण्यावर भाष्य ; भाजपला वैचारिक लढाईची सवय नाही | अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा दिला दाखला

V
Vivek

2 मिनिट वाचन

Sanjay Raut News

Sanjay Raut On Eknath Shinde : अजित पवारांच्या पक्ष सोडण्यावर भाष्य ; भाजपला वैचारिक लढाईची सवय नाही | अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा दिला दाखला

मुंबई :- "एकनाथ शिंदे Eknath Shinde हे पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. भाजपने शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला आणि त्यांना काही काळासाठी मुख्यमंत्री केले. मात्र, आता भाजप त्यांना पुन्हा संधी देणार नाही," असा मोठा दावा शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी केला आहे. पुण्याच्या हनुमंत पवार मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी भाजपसह सर्वोच्च न्यायालयावरही गंभीर आरोप केले आहेत.

'सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भाजपचे कार्यकर्ते'

संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर टीका करताना अत्यंत कठोर शब्द वापरले. ते म्हणाले, "सुप्रीम कोर्टातील बरेच न्यायाधीश हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करतात. त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्या देशाच्या सुप्रीम कोर्टाला 'मूर्ख' म्हटले होते, कारण तिथे लोकशाहीपेक्षा ठराविक विचारधारेला महत्त्व दिले जात होते. लोकशाहीत आम्हाला आमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे."

भाजपकडे कोणता विचार आहे?

"भाजपच्या नेत्यांना लोकशाहीबद्दल थोडी जरी चाड असेल, तर त्यांनी राज्यात सुरू असलेल्या गुंडगिरीकडे लक्ष द्यावे," असे आवाहन करत राऊत यांनी भाजपच्या विचारधारेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "विचारांची लढाई आपण विचारांनी लढू शकतो, पण समोरच्याकडे विचार असावा लागतो. हिंदू-मुस्लिम या पलीकडे भाजपकडे कोणता राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक विचार आहे? त्यांच्याकडे कोणता विचारच नाही," असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवारांच्या फुटीवर मोठे विधान

अजित पवारांसह इतर नेत्यांनी राष्ट्रवादी का सोडली, यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, "माणसाचा जीव इतका नकोसा करायचा की, वैतागून त्याने आपला पक्ष सोडावा आणि समोरच्या पक्षात जावे. हेच अजित पवारांच्या बाबतीत घडले आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा नवाब मलिक हे कुणीही प्रेमाने भाजपजवळ गेलेले नाहीत. केवळ आपली कातडी आणि संपत्ती वाचवण्यासाठी त्यांना हे पाऊल उचलावे लागले, हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे."

लोकशाहीचा गळा घोटला जात आहे

पुण्यातील हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. "जर देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मात्र, सत्तेचा वापर करून विरोधकांना संपवण्याचे काम सुरू आहे," असेही ते म्हणाले.

शेअर करा