मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : संजय राऊतांनी स्वतःची साईज बघून बोलावे!"; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावरून भाजप नेत्यांचा संजय राऊतांवर पलटवार

Mumbai News :मुंबई :- बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर जुहू परिसरात झालेल्या गोळीबारानंतर महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय वाद आणखी टोकाला गेला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

: संजय राऊतांनी स्वतःची साईज बघून बोलावे!"; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावरून भाजप नेत्यांचा संजय राऊतांवर पलटवार
: संजय राऊतांनी स्वतःची साईज बघून बोलावे!"; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावरून भाजप नेत्यांचा संजय राऊतांवर पलटवार

Mumbai News : चंद्रशेखर बावनकुळे आणि नवनाथ बन यांचा ठाकरे गटाच्या नेत्यावर जोरदार घणाघात; राजकीय संघर्ष पेटला

Mumbai News :मुंबई :- बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर जुहू परिसरात झालेल्या गोळीबारानंतर महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय वाद आणखी टोकाला गेला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानावर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर अत्यंत तिखट शब्दांत पलटवार करत, "राऊतांनी नेहमी स्वतःची राजकीय साईज बघूनच वक्तव्ये करावीत," असा सज्जड दम भरला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

विरोधकांकडून केवळ राजकारण; कायदा आपले काम करत असल्याचा भाजपचा दावा

टायगर श्रॉफ प्रकरणावरून महाविकास आघाडीने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. संजय राऊत प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेवर विनाकारण सरकारला लक्ष्य करून राजकीय पोळी भाजून घेत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. मुंबई पोलीस आणि गृहविभाग अत्यंत दक्ष असून, या प्रकरणात अवघ्या 17 तासांच्या आत पोलिसांनी दोन संशयितांना जेरबंद केले आहे. असे असतानाही केवळ प्रसिद्धीसाठी आणि खोट्या अफवा पसरवण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात असल्याचा पलटवार बावनकुळे आणि बन यांनी केला.

सत्ताधारी विरुद्ध विरोधक वाद पेटला; आगामी काळात संघर्षाची चिन्हे

अभिनेत्यावरील हल्ल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या राजकीय कलगीतुर्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखीनच तीव्र झाला आहे. पोलीस एका बाजूने या कटामागील मास्टरमाइंडचा शोध घेत असताना, दुसरीकडे नेतेमंडळींच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा