मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Jadhav : काँग्रेसला 'बदलापूर'मध्ये हादरा! शहराध्यक्ष संजय जाधव शेकडो कार्यकर्त्यांसह थेट शिंदे गटात

Congress Sanjay Jadhav Joined Shivsena Shinde Group : महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाणे-रायगड पट्ट्यात 'धनुष्यबाण'ची मोठी ताकद वाढली; एकनाथ शिंदेंनी काँग्रेसला खिंडार पाडले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Eknath Shinde

Congress Sanjay Jadhav Joined Shivsena Shinde Group : महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाणे-रायगड पट्ट्यात 'धनुष्यबाण'ची मोठी ताकद वाढली; एकनाथ शिंदेंनी काँग्रेसला खिंडार पाडले

मुंबई :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव Sanjay Jadhav यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे.

बदलापूर हा ठाणे-रायगड जिल्ह्याला लागून असलेला महत्त्वाचा भाग मानला जातो. याच भागात काँग्रेसचा बालेकिल्ला कमकुवत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या उपस्थितीत संजय जाधव आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश दिला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून, शिंदे गटाची ताकद या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, महायुतीमध्ये भाजपच्या वाढत्या 'इनकमिंग'मुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये सध्या नाराजीचा सूर आहे. या नाराजीनंतरही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला खिंडार पाडत आपला राजकीय दबदबा कायम ठेवल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून आले आहे.

शेअर करा