मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sandip Deshpande : मनसेच्या 'टी-शर्ट'वर नवीन वाद: 'परेस, नरेस, सुरेस चड्डीत रहायचं' म्हणत गुजराथी भाषिकांना इशारा

Sandip Deshpande T- shirt : टी-शर्टवरील संदेशावरून वादंग

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sandip Deshpande : मनसेच्या 'टी-शर्ट'वर नवीन वाद: 'परेस, नरेस, सुरेस चड्डीत रहायचं' म्हणत गुजराथी भाषिकांना इशारा

Sandip Deshpande T- shirt : टी-शर्टवरील संदेशावरून वादंग

मुंबई :- मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता गुजराथी भाषिकांना लक्ष्य केले आहे. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे Sandip Deshpande यांनी नुकताच 'परेस, नरेस, सुरेस चड्डीत रहायचं' असा संदेश असलेला टी-शर्ट परिधान करून एक नवीन वाद निर्माण केला आहे. या संदेशात गुजराथी भाषिकांच्या उच्चारांची खिल्ली उडवण्यात आली असून, 'श' ऐवजी 'स'चा वापर करण्यात आला आहे. हे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून मनसे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आक्रमक झाली आहे. मीरा रोडमध्ये परप्रांतीय विक्रेत्याला मारहाण झाल्यानंतर मराठीजनांनी मोर्चा काढला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मीरा रोड येथे जाहीर सभा घेऊन मराठीचा अपमान सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता. हा वाद शांत होत असतानाच आता दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरून स्थानिक मराठी विरुद्ध गुजराथी आणि जैन समाजात वाद पेटला आहे. कबुतरखान्याच्या विरोधात मराठी भाषिकांनी भूमिका घेतली आहे, तर गुजराथी आणि जैन समाजाने त्याविरोधात आंदोलन केले होते. याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी हा टी-शर्ट घालून गुजराथी भाषिकांना प्रत्युत्तर दिले असल्याचे मानले जात आहे.

संदीप देशपांडे यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर हे टी-शर्ट घातलेले छायाचित्र प्रसारित केल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी मनसेच्या या भूमिकेचे समर्थन करत, 'मराठीची गळचेपी करणाऱ्या गुजराथी भाषकांना हा सणसणीत इशारा' असल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, कारण ते हिंदू असलेल्या गुजराथींना लक्ष्य करत आहेत. तर काहींनी 'मुस्लिमांची नावे लिहिण्याची हिंमत आहे का?' असा सवालही विचारला आहे.

यापूर्वी संदीप देशपांडे यांनी 'मी हिंदू आहे हिंदी नाही' असा संदेश असलेले टी-शर्टही घातले होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता 'लाव रे तो व्हिडिओ' नंतर 'घाल रे तो टी-शर्ट' अशी मिश्किल चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या नव्या वादाचा आगामी काळात राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

शेअर करा