मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

औंधमध्ये पादचारी महिलांची सुरक्षा धोक्यात

भरदिवसा दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावले लाख रुपयांचे मंगळसूत्र

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

औंधमध्ये पादचारी महिलांची सुरक्षा धोक्यात

भरदिवसा दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावले लाख रुपयांचे मंगळसूत्र

पुणे: शहरातील उच्चभ्रू आणि वर्दळीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औंध येथे भरदिवसा रस्त्याने पायी चाललेल्या एका ४२ वर्षीय महिलेला गाठून दुचाकीस्वार दोन अनोळखी चोरट्यांनी गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

याबाबत औंध परिसरातील रहिवासी असलेल्या एका ४२ वर्षीय महिला फिर्यादीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकलवरील दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(६) आणि ३(५) नुसार जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना बुधवार (ता. २०) रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास औंध येथील सनग्रेस सोसायटीसमोरील फूटपाथवर (पायवाट) घडली.

फूटपाथवर गाठून मारली झडप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काही घरगुती कामानिमित्त औंध येथील सनग्रेस सोसायटीच्या शेजारून पायी चालल्या होत्या. त्या फूटपाथवरून जात असताना पाठीमागून एका दुचाकीवर दोन अनोळखी तरुण आले.

क्षणार्धात दुचाकीवरून पसार
काही समजण्याच्या आतच दुचाकी चालवणाऱ्याने गाडी हळू केली आणि मागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रावर थेट झडप घातली. त्याने गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र जोरात हिसकावून घेतले. महिलेने आरडाओरडा करेपर्यंत दोन्ही चोरटे दुचाकीवरून अत्यंत वेगाने सातारा रस्त्याकडे पसार झाले. भरदिवसा घडलेल्या या जबरी चोरीच्या थरारामुळे औंध परिसरात महिलांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

चतुःशृंगी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सनग्रेस सोसायटी आणि परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण (फुटेज) तपासून संशयित दुचाकीस्वारांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक पोटे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

पुणे क्राईम न्यूज

शेअर करा