मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sabha Raut : संजय राऊतांनी फोडला बॉम्ब! - "उद्धव-राज ठाकरे एकत्र; मुंबईसह प्रमुख महापालिकांमध्ये युतीची घोषणा लवकरच!"

Sanjay Raut On Raj And Uddhav : महायुतीला 'दिल्लीच्या पायावर डोकं ठेवणारे' म्हणून डिवचले; काँग्रेसच्या 'वेगळ्या चुली'वर स्पष्ट नाराजी; संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबईतून सुरू करणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut

Sanjay Raut On Raj And Uddhav : महायुतीला 'दिल्लीच्या पायावर डोकं ठेवणारे' म्हणून डिवचले; काँग्रेसच्या 'वेगळ्या चुली'वर स्पष्ट नाराजी; संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबईतून सुरू करणार

मुंबई :- राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आज मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल विचारले असता, त्यांनी थेट 'येत्या आठवड्यात युतीची अधिकृत घोषणा व्हायला हरकत नाही' असा गौप्यस्फोट केला आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, "या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत." मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक अशा प्रमुख महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीवर बोचरी टीका

युतीच्या प्रश्नावर महायुतीला डिवचताना राऊत म्हणाले की, युतीची घोषणा कधी करणार, हे आम्हाला विचारण्याऐवजी "महायुतीला विचारा, जे दिल्लीत जाऊन अमित शाहंच्या पायावर डोकं ठेवतात, 'आमच्याशी युती करा, युती करा' असं सांगत फिरतात."

काँग्रेसला थेट इशारा

या निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. "काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं दिसत नाही. बिहारच्या निकालानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे," असे ते म्हणाले. त्यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना थेट इशारा दिला: "स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आवाहन असेल, तुम्ही वेगळी चूल मांडून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊ नये."

लढाई मुंबईची

राऊत यांनी स्पष्ट केले की, ही केवळ 29 महापालिकांची लढाई नसून, मुंबईची लढाई आहे. "संयुक्त महाराष्ट्राचा लढा 1956 साली सुरू झाला, तो मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी होता. आम्ही मुंबई अमित शाहंच्या घशात जाऊ देणार नाही," असे म्हणत त्यांनी निवडणुकीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे स्वरूप दिले आहे.

शेअर करा