मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

अटक ते कटक मराठा साम्राज्याचा नकाशा अभ्यासक्रमात पुन्हा समाविष्ट करा

छत्रपती वृषालीराजे भोसले यांची मागणी

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

अटक ते कटक मराठा साम्राज्याचा नकाशा अभ्यासक्रमात पुन्हा समाविष्ट करा

छत्रपती वृषालीराजे भोसले यांची मागणी

निलेश राऊत
पुणे: हिंदू पदपादशाही आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या गौरवासाठी शुक्रवारी, दि. २२ रोजी सकाळी ९ वाजता ‘महाराष्ट्र धर्म मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज सातारा गादीच्या छत्रपती वृषालीराजे भोसले या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मराठा इतिहासाबाबत जनजागृती
‘अटक ते कटक मराठा साम्राज्याचा नकाशा’ या संकल्पनेवर आधारित या मोर्चाद्वारे मराठा इतिहासाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयोजकांनी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारशी संवाद साधून अटक येथील मराठा साम्राज्याच्या नकाशाची पुनर्स्थापना करावी, सदर विषयाला राज्य शासनाने अधिकृत भूमिका देऊन महाराष्ट्रातील जनतेच्या भावना केंद्र शासनापर्यंत ठामपणे पोहोचवाव्यात आदि मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

“ज्यांनी स्वाभिमान पाळला तोच खरा नकाशा आहे,” असा संदेश देत या मोर्चासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पुणे न्यूज

शेअर करा