मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मत्स्यव्यवसाय योजनांसाठी एनएफडीपी पोर्टलवर नोंदणी बंधनकारक

जिल्ह्यातील वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते, मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद तसेच मत्स्यउत्पादन शेतकरी संघ यांना विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

मत्स्यव्यवसाय योजनांसाठी एनएफडीपी पोर्टलवर नोंदणी बंधनकारक

जिल्ह्यातील वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते, मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद तसेच मत्स्यउत्पादन शेतकरी संघ यांना विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य

पुणे: जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व व्यक्ती व संस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म (एनएफडीपी) पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, अर्चना शिंदे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते, मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद तसेच मत्स्यउत्पादन शेतकरी संघ यांना विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एनएफडीपी पोर्टलवर नोंदणी अनिवार्य आहे. ही नोंदणी संबंधित संकेतस्थळावर स्वतः किंवा जवळच्या सीएससी केंद्रात आधारकार्ड व बँक पासबुकसह विनामूल्य करता येणार आहे. तसेच ई-श्रम कार्ड नोंदणीही संबंधित संकेतस्थळावर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

याशिवाय किसान क्रेडिट कार्ड व अपघात गट विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, हडपसर, पुणे येथे संपर्क साधावा.

Registration on NFDP portal mandatory for fisheries schemes

शेअर करा