मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ravindra Dhangekar : "निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा!"; प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यावर रवींद्र धंगेकरांचा मोलाचा सल्ला

Ravindra Dhangekar Latest News : पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा

V
Vivek

2 मिनिट वाचन

Ravindra Dhangekar On Lok Sabha Election

Ravindra Dhangekar Latest News : पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा

पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची Ajit Pawar राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असतानाच, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या गोटात मोठे भगदाड पडल्याचे मानले जात आहे. या घडामोडीवर भाष्य करताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांनी जगतापांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

"कार्यकर्ता एका दिवसात घडत नाही"

प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, "प्रशांतदादा हे पुणे शहरातील एक अत्यंत अभ्यासू आणि सक्षम कार्यकर्ते आहेत. त्यांनी शहराचे महापौर म्हणूनही काम केले आहे. राजकारणात एक चांगला कार्यकर्ता घडण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. मी जरी आज दुसऱ्या पक्षात असलो आणि आमची विचारसरणी वेगळी असली, तरी एका चांगल्या कार्यकर्त्याला सन्मान देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे."

पक्षप्रमुखांचा आदेश सर्वोच्च!

धंगेकर यांनी जगतापांना सल्ला देताना सांगितले की, "पक्षप्रमुखांनी जेव्हा एखादा आदेश दिला असतो, तेव्हा वैयक्तिक अन्याय बाजूला ठेवावा लागतो. पक्षप्रमुखांना संपूर्ण पक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांच्या भविष्याची काळजी असते. 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे, त्यामुळे प्रशांत जगताप यांनी पुन्हा एकदा आपल्या निर्णयाचा विचार करावा. एकदा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला की, पुन्हा शून्यातून उभे राहण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो."

नेमकी नाराजी कशावर?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावे, अशा वाटाघाटी वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या प्रशांत जगताप यांना ही युती रुचलेली नाही. ज्यांच्या विरोधात आपण सातत्याने लढलो, त्यांच्यासोबतच निवडणूक लढणे आपल्या प्रतिमेला तडे देणारे ठरेल, अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते.

भाजपमध्ये जाणार नाही, पण निवडणूक लढणार!

प्रशांत जगताप यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. "मी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. पण माझ्या मनाला जे पटत नाही, ते मी करू शकत नाही. मी महानगरपालिका निवडणूक नक्कीच लढणार आहे, पण कोणत्या पक्षाकडून किंवा स्वतंत्र, याचा निर्णय दोन दिवसात घेईन," असे जगताप यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

शेअर करा