मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मनोज जरांगेंवर रामदास कदमांचा घणाघात; चौकशीचीही केली मागणी

Mumbai News :मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

‘बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय?’ मनोज जरांगेंवर रामदास कदमांचा घणाघात; चौकशीचीही केली मागणी
‘बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय?’ मनोज जरांगेंवर रामदास कदमांचा घणाघात; चौकशीचीही केली मागणी

Mumbai News :मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कदम यांनी केवळ जरांगेंच्या वक्तव्यांवर आक्षेप घेतला नाही, तर त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. ‘तू कोणाकडून सुपारी घेतली आहेस?’ असा सवाल करत त्यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

रामदास कदमांचा मनोज जरांगेंवर गंभीर आरोप


मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी जरांगेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मराठा समाजाने आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंना पाठिंबा दिला; मात्र ते या पाठिंब्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप कदम यांनी केला.

‘बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खातोस, सगळ्यांना फसवतोस,’ असं वक्तव्य करत कदम यांनी जरांगेंवर टीका केली. तसेच, जरांगे नेमकं कोणाची बदनामी करत आहेत आणि त्यांना कोणाकडून पाठिंबा मिळतोय, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

‘एकनाथ शिंदेंना संपवायला निघालास, तर स्वतः संपशील’


रामदास कदम यांनी जरांगे यांना थेट इशाराही दिला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी जरांगेंना लक्ष्य केलं. ‘तू एकनाथ शिंदे यांना संपवायला जात असशील, तर तू स्वतः संपशील,’ अशा शब्दांत कदम यांनी जरांगेंना सुनावलं.

याशिवाय, जरांगे यांच्या संपत्तीची आणि ती कोणाच्या नावावर आहे, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जरांगेंनी मिळवलेल्या पाठिंब्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

५०० कोटींच्या आरोपांचाही उल्लेख


जरांगे यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांचा संदर्भ देत रामदास कदम यांनी ‘दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. ५०० कोटींचा आरोप करतोय, तर बाप दाखव आणि श्राद्ध घाल,’ असं आव्हान दिलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यावरूनही त्यांनी जरांगेंना सुनावलं.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मराठा आंदोलनाशी संबंधित काही कार्यकर्त्यांनीही जरांगेंवर आरोप केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच आता जरांगे यांच्याभोवतीचे आरोप-प्रत्यारोपही चर्चेत आले आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा