मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना "गान रत्न गौरव" पुरस्काराने सन्मानित..

पनवेल : प्रशिक एज्यूकेशन सोसायटी २००६ साली स्थापना करण्यात आली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना "गान रत्न गौरव" पुरस्काराने सन्मानित..

पनवेल : प्रशिक एज्यूकेशन सोसायटी २००६ साली स्थापना करण्यात आली. शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक कार्य, डॉक्टर, गायन या सारख्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला व पुरुषांचे मान सन्मान प्रशिक एज्यूकेशन सोसायटीच्या माध्यमातून दरवर्षी "प्रशिक सन्मान" नावाने गौरविण्यात येत असते. या "२०२४ प्रशिक सन्मान" कार्यक्रमात आदिवासी समाजातील गायिका उषा गणपत वारगडा यांना गायन क्षेत्रातील गान रंजना शिंदे स्मृती गानरत्न गौरव पुरस्कार केंद्रिय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार (दि. १२ जाने.) रोजी सन्मानित करण्यात आले.


उषा गणपत वारगडा या सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. शिवाय त्या मालडुंगे ग्रुप ग्रामपंचायत येथील सदस्या आहेत. त्या आदिवासी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. उषा गणपत वारगडा यांनी आदिवासी समाजात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने अनेक गाणी समाजाच्या आधारावर गायली आहे. त्याचबरोबर मनोरंजन म्हणून अन्य गाणी गायली असून युट्यूब व इस्ट्राग्राम सारख्या सोशियल मिडीयावर व्हिडिओ गाणी पाहायला मिळतात. या सर्वांचा दखल घेऊन प्रशिक एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन, लोकशिक्षक मोहन गायकवाड व देविदास गायकवाड यांनी गायन क्षेत्रमध्ये आदिवासी समाजातील गायिका म्हणून गानरत्न गौरव पुरस्कारासाठी निवड करून केंद्रिय मंत्री ना. रामदास आठवले Ramdas Athawale यांच्या हस्ते अखेर उषा गणपत वारगडा यांना गौरविण्यात आले.

शेअर करा