मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर रोहित पवारांची धाव! अजित पवार अपघात प्रकरणातील पुरावे सादर; "अहवाल थातूरमातूर असल्यास जनता सोडणार नाही!"

Rohit Pawar Meet Ajit Pawar : पोलीस तक्रार का घेत नाहीत?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर रोहित पवारांची धाव! अजित पवार अपघात प्रकरणातील पुरावे सादर; "अहवाल थातूरमातूर असल्यास जनता सोडणार नाही!"

Rohit Pawar Meet Ajit Pawar : पोलीस तक्रार का घेत नाहीत? राज ठाकरेंनी दिले कायद्याचे दाखले | दोन दिवसांत रोहित पवार स्वतःचा 'रिपोर्ट' प्रसिद्ध करणार | मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याच्या मुदतीची आठवण

मुंबई :- अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत असताना, या प्रकरणातील गूढ उकलण्याऐवजी संशय अधिक वाढत चालला आहे. आमदार रोहित पवार यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या अपघातासंदर्भातील तांत्रिक माहिती आणि पुरावे सादर केले. पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करण्यास नकार दिल्याने आता रोहित पवार यांनी जनमत आणि विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी अन् दिला कायद्याचा आधार
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "राज ठाकरेंनी माझी सर्व माहिती शांतपणे ऐकून घेतली. एका मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू होऊनही पोलीस एफआयआर का घेत नाहीत, यावर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. राज साहेबांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे दोन महत्त्वाचे दाखले देत स्पष्ट केले की, अपघाती मृत्यू झाल्यास एफआयआर घेणे हे पोलिसांवर बंधनकारक आहे आणि तो नागरिकांचा अधिकार आहे." यावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

मुरलीधर मोहोळ यांना निर्वाणीचा इशारा

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अपघाताचा अहवाल एका महिन्याच्या आत देण्याचे आश्वासन दिले होते. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, "आज आणि उद्या आम्ही या सरकारी अहवालाची वाट पाहणार आहोत. जर हा अहवाल 'थातूरमातूर' आला किंवा त्यात सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही."

रोहित पवार स्वतःचा अहवाल मांडणार

केवळ सरकारी अहवालावर अवलंबून न राहता, रोहित पवार यांनी दोन दिवसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्वतः गोळा केलेली माहिती आणि अहवाल जनतेसमोर मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. डीजीसीए (DGCA) विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ते अजूनही ठाम आहेत.

शेअर करा