मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; 'दुबार मतदार' प्रश्नावर राज ठाकरे संतापले

Raj Thackeray On Double Voting : पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी मतदान; राज ठाकरेंकडून निवडणूक आयुक्तांवर टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray On Uddhav Thackeray

Raj Thackeray On Double Voting : पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी मतदान; राज ठाकरेंकडून निवडणूक आयुक्तांवर टीका

मुंबई :- अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा केली.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील

पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल.

दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.

राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी केली जाणार आहे, तर १० डिसेंबर २०२५ रोजी या निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर केले जातील.

राज ठाकरेंचा संताप

या निवडणुकीच्या घोषणेनंतरही मतदार यादीतील घोळ संपलेला नसल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील 'सुलभ शौचालय' आणि 'आयुक्तांच्या बंगल्या'वरील मतदारांच्या प्रश्नावर निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ राज ठाकरे यांनी पोस्ट करत टीका केली आहे.

आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन…

शेअर करा