मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : 'मला घड्याळ नको, शोरमा खायला घाल!'; राज ठाकरेंनी डोंबिवलीच्या 'शोरमा गर्ल'ला जिंकलं; शिवतीर्थावर रंगली खास भेट

Raj Thackeray On Shawarma Girl Dombivli : केडीएमसीच्या कारवाईनंतर मनसे धावली होती मदतीला | राज ठाकरेंना भेट म्हणून दिलेलं घड्याळ साहेबांनी केलं परत | "लढत राहिले..

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray : 'मला घड्याळ नको, शोरमा खायला घाल!'; राज ठाकरेंनी डोंबिवलीच्या 'शोरमा गर्ल'ला जिंकलं; शिवतीर्थावर रंगली खास भेट

Raj Thackeray On Shawarma Girl Dombivli : केडीएमसीच्या कारवाईनंतर मनसे धावली होती मदतीला | राज ठाकरेंना भेट म्हणून दिलेलं घड्याळ साहेबांनी केलं परत | "लढत राहिले.. काम करत राहिले", एकता सावंतची भावूक पोस्ट

मुंबई :- इन्स्टाग्रामवर आपल्या शोरमा स्टॉलमुळे प्रसिद्ध झालेली डोंबिवलीची तरुणी एकता सावंत उर्फ 'शोरमा गर्ल' हिने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. महापालिकेच्या कारवाईमुळे संकटात सापडलेल्या एकताला मनसेने मदतीचा हात दिला होता, त्याबद्दल आभार मानण्यासाठी ती 'शिवतीर्था'वर पोहोचली होती. यावेळी राज ठाकरेंनी दाखवलेल्या साधेपणाने आणि मिश्किल टिप्पणीने एकतासह नेटकऱ्यांचीही मने जिंकली आहेत.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

काय घडलं 'शिवतीर्थ'वर?

एकताने राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाली. कृतज्ञता म्हणून तिने राज ठाकरेंसाठी एक घड्याळ भेट म्हणून आणले होते. जेव्हा तिने ती पिशवी राज साहेबांच्या हातात दिली, तेव्हा त्यांनी विचारले, "यात काय आहे?". एकताने 'घड्याळ' असल्याचे सांगताच राज ठाकरेंनी हसून उत्तर दिले, "मला घड्याळ नको, तू मला मस्तपैकी शोरमा घेऊन ये आणि खायला घाल!" असे म्हणत त्यांनी ते घड्याळ प्रेमळपणे एकताला परत केले. राज ठाकरेंच्या या उत्तराने तिथे हशा पिकला आणि एकतालाही साहेबांच्या आपुलकीची प्रचिती आली.

संघर्षात मनसेची साथ

काही महिन्यांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना एकताचा शोरमा स्टॉल जप्त केला होता. व्यवसाय बंद झाल्याने एकता अडचणीत आली होती. अशा वेळी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तिच्या मदतीला धावून आले. त्यांनी राज ठाकरेंचा फोटो असलेला एक नवीन आणि सुसज्ज स्टॉल एकताला दिला, ज्यामुळे तिचा व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाला.

"शाबासकी हेच माझं बक्षीस"

राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकताने शर्मिला ठाकरे यांचीही भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना एकताने पोस्टमध्ये लिहिले की, "लढत राहिले.. काम करत राहिले.. आणि आज राज ठाकरे साहेबांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस ठरलं!"

शेअर करा