मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rain Update : ३२ जिल्ह्यांनाल मुसळधार पावसाचा इशारा; जळगावला 'रेड अलर्ट' घोषित

मुबंई, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

1 मिनिट वाचन

Rain Update

Rain Update : राज्यातील १५ जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' तर १७ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' देण्यात आला

मुबंई, महाराष्ट्र मिरर

Rain Update : भारतीय हवामान विभातर्फे (IMD) महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढल्याने ३२ जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने तिथे 'रेड अलर्ट' घोषित केला आहे. तसेच राज्यातील १५ जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' तर १७ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. rain update heavy rain july 30

FDA : पुण्यातील पेठांमध्ये धडक कारवाई; ५५ लाखांचा निकृष्ट अन्नसाठा जप्त, ५ हॉटेल्सचे परवाने निलंबित

कोकण आणि मुंबई परिसर कोकणात पावसाची संततधार कायम राहणार असून रायगड जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rain Update

जळगाव जिल्ह्यात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे रेड अलर्ट लागू आहे. याशिवाय धुळे व नाशिकला ऑरेंज, तर नंदुरबारला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट भागात 'ऑरेंज अलर्ट' तर उर्वरित भागासाठी 'यलो अलर्ट' आहे. कोल्हापूरच्या घाट विभागामध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवून 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. Rain Update

FDA : शाळेच्या आवारात जंक फूडला सक्त बंदी; अन्न व औषध प्रशासनाचा मोठा निर्णय

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. तसेच परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

प्रशासन आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन

हवामान विभागाने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. नद्या-नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे व अनावश्यक प्रवास टाळण्याचे निर्देश दिले आहेत. सखल भाग, पूरप्रवण क्षेत्रे आणि घाट रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Rain Update

https://www.instagram.com/reel/DbVnHtbtpyN/?igsh=MXdrZXliNWRndXpsZw==

FacebookTwitterEmailWhatsAppShare

शेअर करा