मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

FDA : शाळेच्या आवारात जंक फूडला सक्त बंदी; अन्न व औषध प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे, महाराष्ट मिरर

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

FDA

FDA : आता शाळांच्या आवारात चॉकलेट, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि जंक फूडच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

पुणे, महाराष्ट मिरर

FDA : विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) शालेय परिसराबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार, आता शाळांच्या आवारात चॉकलेट, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि जंक फूडच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. FDA Junk Food Ban Schools Tukaram Mundhe

बदलती जीवनशैली आणि जंक फूडच्या अतिसेवनामुळे बालपणीचा लठ्ठपणा, अॅनिमिया यांसारखे आजार बळावत चालल्याने ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. FDA

Pune University : बनावट पदवी प्रमाणपत्र रॅकेट उघड; रिक्षाचालकाच्या सतर्कतेने फुटले बिंग

FSSAI परवाना अनिवार्य: शाळांमधील कॅन्टीन, टक शॉप्स, मध्याह्न भोजन केंद्रे, वसतिगृहांचे स्वयंपाकघर आणि सर्व अन्नपुरवठादारांना आता वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक आहे. FDA

५० मीटरच्या परिघात बंदी: शाळेच्या आवारात तसेच शाळेच्या प्रवेशद्वारापासून सर्व दिशांना ५० मीटर परिसरात जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या (HFSS) अन्नपदार्थांच्या विक्री, जाहिरात व मोफत वितरणावर सक्त प्रतिबंध असणार आहे.

पौष्टिक आहारावर भर: विद्यार्थ्यांना जंक फूडऐवजी फळे, ताज्या भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्वच्छता व पिण्याचे पाणी: प्रत्येक शाळेत सुरक्षित पिण्याचे पाणी, उच्च दर्जाची स्वच्छता, योग्य अन्न साठवणूक, कीड नियंत्रण आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल.

FDA : पुण्यातील पेठांमध्ये धडक कारवाई; ५५ लाखांचा निकृष्ट अन्नसाठा जप्त, ५ हॉटेल्सचे परवाने निलंबित

विशेष फलक व अधिकारी: शाळांमध्ये 'Food Safety Display Board' लावून 'Food Safety Supervisor' आणि 'Health and Wellness Ambassador' (नोडल अधिकारी) यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

वर्षभरात दोनदा तपासणी: प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोन वेळा अन्न सुरक्षा तपासणी आणि किमान एकदा अन्न नमुन्यांचे संकलन केले जाईल.

नियमभंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, कॅन्टीनचालक, पुरवठादार आणि विक्रेत्यांविरुद्ध तात्काळ सुधारणा सूचना, परवाना निलंबन वा रद्द करणे, अन्नपदार्थ जप्ती आणि आवश्यकतेनुसार कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या संपूर्ण मोहिमेत शालेय शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्या स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/DbVnHtbtpyN/?igsh=MXdrZXliNWRndXpsZw==

शेअर करा