Nashik News : राहुल गांधी आज नाशिकमध्ये? आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे लागले लक्ष
Nashik News : नाशिक : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
1 मिनिट वाचन

Nashik News : आज काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन; आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्याची शक्यता
Nashik News : नाशिक : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपासाठी राहुल गांधी दि. २ (आज)नाशिकला येणार आहेत.https://maharashtramirror.com/ Nashik News
दरम्यान, नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आश्रमशाळांमधील सुविधा, पोषण आहार आणि शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्याची किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Nashik News
राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत काँग्रेसकडून कमालीची गोपनीयता राखली जात आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार असल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर ते गंगापूर धरण परिसरातील एमटीडीसी रिसॉर्ट येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहेत.https://maharashtramirror.com/ Nashik News
या शिबिरात राज्यातील जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना संघटनात्मक बांधणी, पक्षाची दिशा, आगामी राजकीय आव्हाने आणि काँग्रेसची विचारधारा याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप होणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि राहुल गांधींचा नाशिक दौरा यामुळे आजपासूनच नाशिकच्या राजकीय वातावरणाला चांगलीच रंगत आली आहे. त्यांच्या संभाव्य भेटीकडे काँग्रेससह विरोधकांचे आणि सत्ताधारी पक्षाचेही लक्ष लागले आहे.




