मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi news : जंतरमंतरवर तिरंगा फडकवणाऱ्या तरुणांना अटक करणे भ्याडपणाचे कृत्य: राहुल गांधी

Delhi news :नवी दिल्ली: दिल्लीच्या ऐतिहासिक जंतरमंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करताना आणि राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवल्याबद्दल 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या नेत्यांना आणि तरुणांना अटक करण्यात आल्याच्या घटनेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

जंतरमंतरवर तिरंगा फडकवणाऱ्या तरुणांना अटक करणे भ्याडपणाचे कृत्य: राहुल गांधी
जंतरमंतरवर तिरंगा फडकवणाऱ्या तरुणांना अटक करणे भ्याडपणाचे कृत्य: राहुल गांधी

Delhi news : कोणतेही समांतर आंदोलन सुरू नाही, केवळ एकच आंदोलन सुरू असल्याची ग्वाही

Delhi news :नवी दिल्ली: दिल्लीच्या ऐतिहासिक जंतरमंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करताना आणि राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवल्याबद्दल 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या नेत्यांना आणि तरुणांना अटक करण्यात आल्याच्या घटनेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.https://maharashtramirror.com/ Delhi news

जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे हा कोणताही गुन्हा नसून, तरुणांना तुरुंगात डांबणे हे केंद्र सरकारच्या भ्याडपणाचे लक्षण आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर हा परिसर निदर्शनांसाठी अधिकृत ‘निषेध स्थळ’ म्हणून रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर, सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी तेथे जाऊन तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि न्यायालयासमोर सुनावणीनंतर त्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईवर संताप व्यक्त करत राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट लिहून सरकारवर कडाडून हल्लाबोल केला आहे.

आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे की, “जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलनादरम्यान तिरंगा फडकवणे हा कोणताही गुन्हा नाही. त्याबद्दल तरुणांना तुरुंगात टाकणे हे भ्याडपणाचे कृत्य आहे.” विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि ‘इंडिया’ आघाडीचे सर्व घटक पक्ष वेगवेगळ्या बॅनरखाली एकत्र असले तरी त्यांचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे नागरिकांच्या हक्कांची व संविधानाची रक्षा करणे, असे त्यांनी स्पष्ट केले. 'इंडिया' आघाडीतील आपल्या सहकाऱ्यांसोबत माध्यमांशी बोलताना गांधी म्हणाले, “आम्ही इथे एकात्मभावाने एकत्र उभे आहोत; येथे कोणतेही समांतर आंदोलन सुरू नाही, केवळ एकच आंदोलन सुरू आहे.”
तसेच, “जंतरमंतर हे भारताच्या जनतेचे आहे आणि आम्ही ते परत मिळवणारच,” असा ठाम निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दुसरीकडे, सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनीही या कारवाईचा कडक शब्दांत निषेध केला आहे. देशात स्वतःचा राष्ट्रध्वज फडकवणे जर गुन्हा ठरत असेल, तर सरकारने थेट अधिकृतपणे आणीबाणी घोषित करावी, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी या कठीण प्रसंगी सीजेपीच्या नेत्यांना जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल दिपके यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि इतर लोकशाही मुद्यांवरून विरोधक आणि विविध संघटनांचे केंद्र सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे या संपूर्ण प्रकरणामुळे निर्माण झाली आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा