मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rahul Gandhi : मतदार यादीतील 'हाऊस नंबर 0' चा घोळ, राहुल गांधींकडून धक्कादायक पुरावे सादर

Rahul Gandhi On Election Commission : '93 हजार बेघर मतदारांचा दावा खोटा'; 'बेघर' मतदारांकडे मोठी घरे, ब्राझिलियन मॉडेलच्या 'बोगस' मतदानाचाही केला पर्दाफाश

V
Vivek

2 मिनिट वाचन

Rahul Gandhi : मतदार यादीतील 'हाऊस नंबर 0' चा घोळ, राहुल गांधींकडून धक्कादायक पुरावे सादर

Rahul Gandhi On Election Commission : '93 हजार बेघर मतदारांचा दावा खोटा'; 'बेघर' मतदारांकडे मोठी घरे, ब्राझिलियन मॉडेलच्या 'बोगस' मतदानाचाही केला पर्दाफाश

ANI :- लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी आज (बुधवार) नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील घोळाचे धक्कादायक पुरावे प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. ज्या मतदारांच्या घराचा क्रमांक शून्य (House No 0) आहे, ते बेघर आहेत, हा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत देशात तब्बल 93 हजार बेघर मतदार असल्याचे म्हटले होते. या मतदारांकडे राहण्यासाठी घर नसल्याने त्यांच्या पत्त्यावर घराचा क्रमांक '0' लिहिला जातो. ज्ञानेश कुमार यांच्या या दाव्यावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतात की, काही लोकांकडे घर नसतं आणि ते जिथे झोपतात ती जागा यांचा पत्ता हाऊस नंबर 0 असतो. आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा हरियाणातील हाऊस नंबर 0 पत्ता असणाऱ्या मतदाराची ओळख पटली. मात्र, प्रत्यक्षात या व्यक्तीचे गावात मोठे घर होते.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, हाऊस नंबर 0 पत्ता असलेले हे मतदार निवडणूक झाल्यानंतर सापडत नाहीत, ते मतदान होताच गायब होतात. "ज्ञानेश कुमार खोटं बोलत आहेत. मतदार यादीतील ही गोष्ट चूक नाही, तर जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे," असे गंभीर विधान राहुल गांधी यांनी केले. तसेच, 'बेघर' व्यक्तींचे कपडे पाहून ते बेघर नाहीत, हे स्पष्टपणे लक्षात येते, असेही ते म्हणाले.

यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढून टाकण्यासाठी सॉफ्टवेअर आहे, पण ते ते का वापरत नाहीत? यासाठी एआयचीही आवश्यकता नाही; ते काही सेकंदात ते काढून टाकू शकतात, पण ते असे करत नाहीत कारण त्यांना भाजपला मदत करायची आहे, असा आरोप त्यांनी केला. हा ठोस पुरावा आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी एका ब्राझिलियन मुलीचा (मॉडेलचा) फोटो दाखवला आणि विचारले, "निवडणुकीत तिची भूमिका काय आहे?" ते म्हणाले की, या ब्राझिलियन मुलीने हरियाणा विधानसभा निवडणुकीत 10 वेळा मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी आयोगाच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे.

शेअर करा