मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : भाजपने लोकशाही हायजॅक केली; 300 खासदारांना अडवून पोलीस धमकावत आहेत' — राहुल गांधींचा गंभीर आरोप, आकाशवाणी भवनासमोर ठिय्या

Delhi News : नवी दिल्ली :- केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशाची राजधानी दिल्लीत 'इंडिया' (INDIA) आघाडीचे आंदोलन अत्यंत आक्रमक आणि हिंसक वळणावर पोहोचले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

'भाजपने लोकशाही हायजॅक केली; 300 खासदारांना अडवून पोलीस धमकावत आहेत' — राहुल गांधींचा गंभीर आरोप, आकाशवाणी भवनासमोर ठिय्या
'भाजपने लोकशाही हायजॅक केली; 300 खासदारांना अडवून पोलीस धमकावत आहेत' — राहुल गांधींचा गंभीर आरोप, आकाशवाणी भवनासमोर ठिय्या

Delhi News : नवी दिल्ली :- केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशाची राजधानी दिल्लीत 'इंडिया' (INDIA) आघाडीचे आंदोलन अत्यंत आक्रमक आणि हिंसक वळणावर पोहोचले आहे. ठरलेल्या नियोजनानुसार विरोधी पक्षांच्या शेकडो खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढलेला महामोर्चा पोलिसांनी मध्यभागीच रोखल्यानंतर संपूर्ण दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह सर्वपक्षीय खासदारांनी भररस्त्यात ठिय्या मांडला असून, "लगालो जीतना जोर लगाना है, ज्ञानेश का इस्तिफा लेकर रहेंगे!" आणि "वोट चोर गद्दी छोड!" अशा रणशिंग फुंकणाऱ्या घोषणांनी आकाशवाणी भवनाचा संपूर्ण परिसर हादरवून सोडला आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

'300 खासदार भेटू इच्छितात, पण पोलीस धमकावतायत; निवडणूक आयुक्तांनी समोर यावे'

आंदोलनाच्या ठिकाणावरून थेट पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर घणाघाती हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले, "इंडिया आघाडीचे 300 खासदार मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून आपली भूमिका मांडू इच्छितात. मात्र, पोलीस आम्हाला अर्ध्या रस्त्यात अडवून धमकावत आहेत. या दडपशाहीचे नेमके कारण काय? निवडणूक आयुक्तांनी स्वतः बाहेर येऊन आमचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. भाजप सरकारने संपूर्ण देशातील लोकशाही यंत्रणा हायजॅक केली आहे. आम्हाला जबरदस्तीने आकाशवाणी भवनाजवळ थांबवून ठेवण्यात आले आहे, पण आम्ही मागे हटणार नाही!"

'आकाशवाणी भवनाला छावणीचे रूप; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली'

आकाशवाणी भवनाच्या गेट नंबर 3 समोर अवघ्या 100 मीटर अंतरावर पोलिसांनी भक्कम बॅरिकेडिंग करून विरोधकांचा मोर्चा रोखला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि पॅरामिलिट्री फोर्स तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस अधिकारी सुरक्षेसाठी 'बॉडी कॅमेरे' लावून प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि देशातील सर्व आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी 'बॅलेट पेपर'वर घेण्यात याव्यात, या प्रमुख मागणीवर सर्व विरोधी पक्ष ठाम असून दिल्लीतील या हाय-व्होल्टेज आंदोलनामुळे केंद्र सरकारची कोंडी झाली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा