मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : वडगाव-धायरीतील बेकायदा ‘आरएमसी’ प्लांटवर कुणाचा वरदहस्त?

Pune News : येथील कारवाई वारंवार रद्द केली जात असल्याने या अनधिकृत प्लांटचालकांना नेमके कोणाचे अभय आहे असा संतप्त प्रश्न नागरिक विचारात आहेत; आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहर अभियंत्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश "वडगाव खुर्दमधील ‘आरएमसी’ प्लांटवर कारवाई होणार असल्याची आपल्याला पूर्वकल्पना नव्हती.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

वडगाव-धायरीतील बेकायदा ‘आरएमसी’ प्लांटवर कुणाचा वरदहस्त?
वडगाव-धायरीतील बेकायदा ‘आरएमसी’ प्लांटवर कुणाचा वरदहस्त?

Pune News : येथील कारवाई वारंवार रद्द केली जात असल्याने या अनधिकृत प्लांटचालकांना नेमके कोणाचे अभय आहे असा संतप्त प्रश्न नागरिक विचारात आहेत; आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहर अभियंत्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश
"वडगाव खुर्दमधील ‘आरएमसी’ प्लांटवर कारवाई होणार असल्याची आपल्याला पूर्वकल्पना नव्हती. पण एका व्यक्तीने मेसेज करून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी विनंती केली, त्यामुळे कारवाई थांबविली आहे. वडगाव, धायरी भागातील प्लांट अनधिकृत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यास कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई केली जाईल." - नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे मनपाhttps://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : महत्वाचे मुद्दे


Pune News : *पुणे शहर आणि लगतच्या परिसरात सुमारे ३०० ते ३२५ 'आरएमसी' प्लांट कार्यरत, यातील बहुतांश प्लांट अनधिकृत
*नियम पायदळी तुडवत चालवल्या जाणाऱ्या या प्लांट्समुळे हवेत प्रचंड धूळ उडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
*आरएमसी टँकरमुळे रहदारीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि शहरात गंभीर अपघात झाले आहेत
*अतिक्रमण विभागाने बावधन, लोहगाव-खांदवेनगर आणि उंड्रीतील अनेक अनधिकृत आरएमसी प्लांट जमीनदोस्त केले
*गेल्या पाच महिन्यांत दोनदा वडगाव आणि धायरीतील कारवाई मागे घेण्यात आली

Pune News : पुणे, धनश्री ओतारी

Pune News : पुणे महानगरपालिकेकडून (मनपा) शहरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटवर धडक कारवाईचे सत्र सुरू असताना, वडगाव आणि धायरी परिसरातील बेकायदा प्लांटबाबत मात्र वेगळाच न्याय लावला जात आहे. कारवाईचे नियोजन करायचे, पोलिस बंदोबस्त मागवायचा आणि ऐनवेळी पथक माघारी फिरवायचे, असा खेळ गेल्या पाच महिन्यांत दोनदा घडल्याने महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेवर गंभीर संशय निर्माण झाला आहे. अखेर हा संपूर्ण प्रकार महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी बुधवारी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

पुणे शहर आणि लगतच्या परिसरात सुमारे ३०० ते ३२५ 'आरएमसी' प्लांट कार्यरत असून, यातील बहुतांश प्लांट अनधिकृतपणे चालवले जात आहेत. नियमांची कोणतीही अंमलबजावणी न करता ऐसपैस चालवल्या जाणाऱ्या या प्लांट्समुळे हवेत प्रचंड धूळ उडत असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, काही दिवांसपूर्वी बावधन येथील अनधिकृत आरएमसी प्लांट तसेच, लोहगाव-खांदवेनगर परिसरातील सात, तर उंड्री भागातील पाच अनधिकृत आरएमसी प्लांट महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले होते. काही प्लांट सील देखील करण्यात आले होते.

अंतिम क्षणी पथकाला माघारी फिरण्याचे आदेश
याच कारवाईचा भाग म्हणून महापालिकेने वडगाव-धायरी भागातील नदीकाठच्या आणि कालव्यालगतच्या अनधिकृत आरएमसी प्लांटवर कारवाईची आखणी केली होती. मात्र, पहिल्या वेळी ऐनवेळी ही कारवाई स्थगित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सोमवारी (ता. १९) सकाळी याच ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून धडक कारवाईचे नियोजन झाले होते. परंतु, सोमवारीही अंतिम क्षणी पथकाला माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आले. एकाच भागातील बेकायदा प्लांटवर वारंवार कारवाई रद्द केली जात असल्याने या अनधिकृत प्लांटचालकांना नेमके कोणाचे अभय आहे, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवासी विचारत आहेत.

सोमवारी होणार असलेल्या या कारवाईची कोणतीही माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांना देण्यात आली नव्हती. ही बाब समोर आल्यानंतर आयुक्तांनी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. परस्पर कारवाईचे नियोजन करायचे आणि कोणाच्या तरी दबावाखाली ती रद्द करायची, ही शिस्तप्रिय कारभाराला धरून नसल्याचे आयुक्तांनी सुनावले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा