मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका; दोन सराईत टोळ्या जेरबंद

२३ गुन्हे उघड करून ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका; दोन सराईत टोळ्या जेरबंद

२३ गुन्हे उघड करून ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे: पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २३ गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांच्याकडून ३२ तोळे सोन्याचे दागिने आणि वाहने असा एकूण ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील जबरी चोरी, चैन स्नॅचिंग आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन रेकॉर्डवरील आरोपींवर कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता.

टोळी क्र. १: घरफोडी करणारे सराईत अटकेत
मंचर आणि नारायणगाव परिसरातील रेकॉर्डवरील आरोपी हर्षल तांदळे आणि महेश मंगळवेढेकर यांचा घरफोडीत सहभाग असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्याप्रमाणे पथकाने सापळा लावून हर्षल दत्तात्रय तांदळे (वय २५) आणि महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय २५, दोघे रा. मंचर, ता. आंबेगाव) यांना पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० तोळे सोने, एक पल्सर मोटारसायकल आणि दोन बंब असा एकूण २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हर्षल तांदळे याला जानेवारी २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते, मात्र त्याने हद्दपारीचा भंग करून हे गुन्हे केले. या टोळीकडून नारायणगाव, मंचर, घोडेगाव, पारगाव, आळेफाटा आणि जुन्नर येथील ६ गुन्हे उघड झाले आहेत.

टोळी क्र. २: चैन स्नॅचिंग करणारे निष्पन्न
दुसरीकडे, चैन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पियुष नानावत याने साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पियुष बिरम नानावत (वय १९, रा. सांगेशी, कामशेत) याला ताब्यात घेतले असता, तो काही महिन्यांपूर्वीच बालसुधारगृहातून बाहेर आल्याचे समोर आले. त्याने दोन विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने उरुळी कांचन, खेड, शिरूर, दौड, लोणावळा, भोर, सासवड यांसह विविध भागांत १७ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १२ तोळे सोने आणि मोटारसायकल असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची यशस्वी कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि त्यांच्या विविध पथकांनी केली आहे.

Pune Rural Police crackdown; Two inn gangs arrested

शेअर करा