मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Khadakwasla Dam Overflow: खडकवासला ओव्हरफ्लो! मुठा नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा वेढा

Khadakwasla Dam Overflow : पुणे शहर आणि धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे.

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

Khadakwasla Dam Overflow

Khadakwasla Dam Overflow : खडकवासला धरण १०० टक्के भरले; २७ हजार क्युसेक वेगाने विसर्ग, सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये शिरले पाणी, भिडे पूल पाण्याखाली

Khadakwasla Dam Overflow : पुणे शहर आणि धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे. अवघ्या आठ दिवसांत धरणांमध्ये तब्बल १० टीएमसी नवा पाणीसाठा जमा झाला असून, एकूण साठा १४ टीएमसीवर पोहोचला आहे. ( Khadakwasla Dam Overflow )

दरम्यान, खडकवासला धरण १०० टक्के भरल्यामुळे मध्यरात्रीपासून मुठा नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या नदीत २७ हजार २०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने मुठा नदीला पूर आला असून, शहरातील सखल भागांत आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ( khadakwasla dam overflow pune rain update)

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यासाठी पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल

धरणनिहाय पाणीसाठा (एकूण साठा: १४ टीएमसी)

धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. आज सकाळी नोंदवला गेलेला धरणनिहाय साठा पुढीलप्रमाणे आहे:
खडकवासला: १.९७ टीएमसी (१०० टक्के)
पानशेत: ५.२० टीएमसी (४५.३६ टक्के)
वरसगाव: ५.८१ टीएमसी (४५.३६ टक्के)
टेमघर: ०.९८ टीएमसी (२६.५० टक्के) ( Khadakwasla Dam Overflow )

सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये पाणी; बचावकार्य सुरू

खडकवासला धरणातून नदीपात्रात करण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील जलपूजन, द्वारका आणि शारदा सरोवर या सोसायट्यांच्या पार्किंग आणि तळमजल्यांवर पाणी शिरले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन वाहने आणि आपत्कालीन बोटींसह जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ( Khadakwasla Dam Overflow )

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

महापौर मंजुषा नागपूरे या पहाटे ५ वाजल्यापासून स्वतः मैदान उतरल्या असून त्यांनी नदीकाठच्या पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी रजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, एकतानगरी आणि निंबज नगर परिसराचा आढावा घेऊन महापालिका प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे आदेश दिले. बाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी महापालिकेने पूर्ण केली आहे.

Pune Rain : कामं केलेल्या ८५ ठिकाणांचे थेट पावसातील फोटो दाखवा मंत्री मोहोळांकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती!

भिडे पूल पाण्याखाली; नदीपात्रात ४ वाहने अडकली

नदीची पाणी पातळी प्रचंड वाढल्यामुळे डेक्कन जिमखाना येथील प्रसिद्ध बाबा भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाने नदीपात्रातील रस्त्यावरील वाहतूक बंद केली असून नागरिकांना आपली वाहने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन आधीच केले होते. मात्र, काहींनी निष्काळजीपणा दाखवल्यामुळे नदीपात्रात उभी असलेली ४ वाहने पुराच्या पाण्यात अडकली आहेत. ( Khadakwasla Dam Overflow )

हेही वाचा: Pune Flood : खडकवासलातून २७ हजार क्युसेक विसर्ग; महापौर मंजुषा नागपुरे पहाटेच 'अ‍ॅक्शन मोड'वर

महापुराचा धोका; विसर्ग ३३ हजारांवर जाण्याची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार धरण क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास, खडकवासला धरणातून मुठा नदीत केला जाणारा विसर्ग ३३ हजार क्युसेकपर्यंत वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. विसर्ग वाढल्यास पुणे शहरात महापुराचे संकट ओढवू शकते. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( Khadakwasla Dam Overflow )

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा