Pune police news : पुण्यातील प्रसिद्ध सुर्वेज हॉटेलवर कारवाई; ६१ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त
पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune police news : बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुतारवाडी, पाषाण परिसरातील प्रसिद्ध सुर्वेज हॉटेलवर पोलिसांनी कारवाई करत अवैध दारू विक्रीसाठी ठेवलेला साठा जप्त केला आहे.
1 मिनिट वाचन

हॉटेल मॅनेजरसह मालकाला अटक; बाणेर पोलिसांची कारवाई : Pune police news
पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune police news : बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुतारवाडी, पाषाण परिसरातील प्रसिद्ध सुर्वेज हॉटेलवर पोलिसांनी कारवाई करत अवैध दारू विक्रीसाठी ठेवलेला साठा जप्त केला आहे. या कारवाईत हॉटेल मॅनेजरसह मालकाला अटक करण्यात आली असून, एकूण ६१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Maharashtra Mirror Pune Police

दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी बाणेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप हे गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त व अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुंबई-बंगळुरू महामार्ग सर्व्हिस रोडलगत, सुतारवाडी, पाषाण येथील सुर्वेज ढाबा येथे बेकायदेशीररित्या दारू विक्री सुरू आहे. Pune police news : Maharashtra Mirror

मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक सानप यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता हॉटेलच्या आत दारू व बिअरच्या बाटल्यांचा साठा आढळून आला.
पोलिसांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या मॅनेजरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव गोपाळ श्रीकृष्ण निचळ (वय ४५, रा. पौड रोड, भुगाव, पुणे) असे असल्याचे समोर आले. त्याच्याकडून अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी हॉटेल मॅनेजर गोपाळ निचळ याच्यासह हॉटेल मालक कुणाल सुधाकर गायकवाड (वय ३९, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-४ चुलूमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तसेच पोलीस अंमलदार सौरभ पाटील आणि गणेश मुंढे यांनी केली.




