मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : लोहगावातील ११ एकर अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेचा हातोडा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने लोहगावातील खांदवेनगरजवळील सर्व्हे क्रमांक ९७/१० मधील सुमारे ११ एकर अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई केली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

लोहगावातील ११ एकर अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेचा हातोडा ‘समृद्धी हायटेक पार्क’मधील सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रस्ते जेसीबीच्या साहाय्याने तोडले
लोहगावातील ११ एकर अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेचा हातोडा ‘समृद्धी हायटेक पार्क’मधील सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रस्ते जेसीबीच्या साहाय्याने तोडले

Pune News :‘समृद्धी हायटेक पार्क’मधील सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रस्ते जेसीबीच्या साहाय्याने तोडले

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने लोहगावातील खांदवेनगरजवळील सर्व्हे क्रमांक ९७/१० मधील सुमारे ११ एकर अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई केली. ‘समृद्धी हायटेक पार्क’ या नावाने विकसित करण्यात आलेल्या प्लॉटिंगमधील अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने तोडले.https://maharashtramirror.com/ pune News

पुणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरील कारवाईनंतर आता अनधिकृत प्लॉटिंगवरही कारवाईचा बडगा उगारला असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ pune News

अनधिकृत प्लॉटिंगवरील या कारवाईमुळे प्लॉटिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, आवश्यक परवानग्यांशिवाय प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

जमीन खरेदी करणाऱ्या नागरिकांनी व्यवहार करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या, कागदपत्रे तसेच संबंधित जमिनीचा झोन तपासावा. तसेच त्या भागात महापालिकेकडून नागरी सुविधा व बांधकाम परवानग्या दिल्या जाऊ शकतात का, याची खात्री करूनच जमीन खरेदी करावी.
– सोमनाथ बनकर

उपायुक्त, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, पुणे महापालिका

प्लॉटिंग व्यावसायिकांना कारवाईचा इशारा

नागरिकांची दिशाभूल करून किंवा आवश्यक परवानग्यांशिवाय प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्यांनी गैरप्रकार थांबवावेत. अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी दिला.

नागरिकांनी जमीन खरेदी करताना केवळ जाहिराती किंवा विक्रेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास न ठेवता अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी काय लक्षात ठेवावे?

  • प्लॉट एनए (NA) असल्याची खात्री करावी.
  • महापालिकेची परवानगी घेऊन प्लॉटिंग करण्यात आली आहे का, हे तपासावे.
  • जमिनीचा झोन (नागरी / शेती / औद्योगिक) पडताळून पाहावी.
  • त्या ठिकाणी नागरी सुविधा व बांधकाम परवानगी मिळू शकते का, याची खात्री करावी.
  • केवळ जाहिराती किंवा विक्रेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये.
  • शंका असल्यास महापालिका कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी .
  • ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

    शेअर करा