Pune News : लोहगावातील ११ एकर अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेचा हातोडा
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने लोहगावातील खांदवेनगरजवळील सर्व्हे क्रमांक ९७/१० मधील सुमारे ११ एकर अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई केली.
1 min read

Pune News :‘समृद्धी हायटेक पार्क’मधील सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रस्ते जेसीबीच्या साहाय्याने तोडले
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने लोहगावातील खांदवेनगरजवळील सर्व्हे क्रमांक ९७/१० मधील सुमारे ११ एकर अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई केली. ‘समृद्धी हायटेक पार्क’ या नावाने विकसित करण्यात आलेल्या प्लॉटिंगमधील अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने तोडले.https://maharashtramirror.com/ pune News
पुणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरील कारवाईनंतर आता अनधिकृत प्लॉटिंगवरही कारवाईचा बडगा उगारला असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ pune News
अनधिकृत प्लॉटिंगवरील या कारवाईमुळे प्लॉटिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, आवश्यक परवानग्यांशिवाय प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
जमीन खरेदी करणाऱ्या नागरिकांनी व्यवहार करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या, कागदपत्रे तसेच संबंधित जमिनीचा झोन तपासावा. तसेच त्या भागात महापालिकेकडून नागरी सुविधा व बांधकाम परवानग्या दिल्या जाऊ शकतात का, याची खात्री करूनच जमीन खरेदी करावी.
– सोमनाथ बनकर
उपायुक्त, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, पुणे महापालिका
प्लॉटिंग व्यावसायिकांना कारवाईचा इशारा
नागरिकांची दिशाभूल करून किंवा आवश्यक परवानग्यांशिवाय प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्यांनी गैरप्रकार थांबवावेत. अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी दिला.
नागरिकांनी जमीन खरेदी करताना केवळ जाहिराती किंवा विक्रेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास न ठेवता अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी काय लक्षात ठेवावे?


