मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune crime: पर्वती येथे ज्येष्ठ नागरिकाची २७ लाख २० हजारांची ऑनलाईन फसवणूक

Pune crime: पुणे, महाराष्ट्र मिरर : सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणुकीचे जाळे पसरवले असून पुण्यात एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पर्वती येथे ज्येष्ठ नागरिकाची २७ लाख २० हजारांची ऑनलाईन फसवणूक
पर्वती येथे ज्येष्ठ नागरिकाची २७ लाख २० हजारांची ऑनलाईन फसवणूक

Pune Crime पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune crime: पुणे, महाराष्ट्र मिरर : सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणुकीचे जाळे पसरवले असून पुण्यात एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध कारणांचा बहाणा करून भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल २७ लाख २० हजार रुपये उकळले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात अनोळखी मोबाईलधारक आणि बँक खातेदारांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर क्र. २ येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी १३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अज्ञात मोबाईलधारकांनी संपर्क साधला. भामट्यांनी विविध कारणे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 'बँक ऑफ इंडिया'मधील 'पदमावती एंटरप्रायझेस'च्या नावावर असलेल्या बँक खात्यावर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. आरोपींच्या जाळ्यात अडकल्यामुळे फिर्यादी यांनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवले. https://maharashtramirror.com/ Pune crime

अशा प्रकारे आरोपींनी फिर्यादी यांची एकूण २७ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २०४, ३१८ (४), ३१९ (२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.https://maharashtramirror.com/ pune crime

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर करत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाईन आमिषांना किंवा अनोळखी फोन कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा