मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : एकत्र मंच, पण वेगळं मन? शरद पवार - अजित पवार पुन्हा एकदा आमनेसामने, पण संवादशून्य

•एआय’ चर्चा सत्रात दोघांची उपस्थिती; आसन व्यवस्था बदलून टाळले शेजारी बसणे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sharad Pawar Group

•एआय’ चर्चा सत्रात दोघांची उपस्थिती; आसन व्यवस्था बदलून टाळले शेजारी बसणे

पुणे | पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या विषयावर आयोजित चर्चा सत्र एक वेगळ्याच राजकीय रंगात रंगले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या सत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थिती लावली. मात्र, दोन वर्षांपूर्वी राजकीय फाटाफुटीनंतर पहिल्यांदाच दोघे एकाच व्यासपीठावर दिसले, तरी संवादाची नाळ मात्र तुटलेलीच राहिली.

चर्चा सत्रात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस अजित पवार यांचे आसन शरद पवार यांच्या शेजारी ठेवण्यात आले होते. पण अजित पवार व्यासपीठावर येताच त्यांनी आसन व्यवस्था बदलवली व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी शरद पवार यांच्याजवळ ठेवण्यात आली. यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याजवळ बसण्याचे टाळल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन उद्या (10 जून) देशभर साजरा होणार आहे. एक गट पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरा गट बालेवाडी स्टेडियमवर अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिन साजरा करणार आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर झालेली ही एकत्रित उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

राजकीय वर्तुळात यावरून पुन्हा एकदा दोन्ही गट एकत्र येणार का? याची कुजबुज सुरू झाली आहे. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अवघडलेले संबंध आणि मंचावरील अवोइडन्स हेच काहीसं स्पष्ट संकेत देत आहेत की, वाट एकच असली तरी चालण्याचे पाय अजूनही स्वतंत्र आहेत.

हेही वाचा: Mumbra Train Accident : मुंब्रा-दिवा अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय

शेअर करा