मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : पुणे विधान परिषद निवडणुकीत श्रीकांत पाटील यांची माघार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरदचंद्र पवार) निर्णय

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरदचंद्र पवार) निर्णय

पुणे: पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे आणि निवडणूक प्रक्रियेची पवित्रता अबाधित राहावी या व्यापक भूमिकेतून पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.PUNE NEWS

माध्यमांना दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात पाटील म्हणतात, "राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई अजित पवार यांच्या विनंतीला मान देत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या निवडणुकीतून माघार घेत आहोत.PUNE NEWS

"लोकशाही प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास असून, राजकारणात मूल्याधिष्ठित भूमिका कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील."

PUNE NEWS

शेअर करा