PUNE NEWS : तेलवाहू जहाजावरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना “शहीद” दर्जा द्या
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची मागणी
1 मिनिट वाचन

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची मागणी
पुणे, महाराष्ट्र मिरर PUNE NEWS : ओमानच्या आखातात MT Settebello या तेलवाहू जहाजावर कार्यरत असताना अमेरिकन लष्करी कारवाईदरम्यान मृत्यूमुखी पडलेले भारतीय नागरिकांना मरणोत्तर “शहीद” दर्जा देण्यात यावा, तसेच त्यांच्या कुटुंबियांना न्याय व सन्मान मिळावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.PUNE NEWS

यासंदर्भातील निवेदन पुणे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष (मीडिया व कम्युनिकेशन) अक्षय जैन, प्रदेश सरचिटणीस आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत, सचिव विश्वजीत जाधव, सद्दाम शेख, अथर्व सोनार, अक्षय नवगिरे आदी उपस्थित होते.PUNE NEWS
निवेदनात म्हटले आहे, पतनाला सुरेश, आदित्य शर्मा आणि शिवानंद चौरसिया हे तिन्ही भारतीय नागरिक आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीत परदेशात कार्यरत होते. ते कोणत्याही युद्धाचा किंवा लष्करी संघर्षाचा भाग नव्हते. मात्र आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या छायेत त्यांना आपला जीव गमवावा लागला
त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य देशासमोर आणावे.
भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकारने ठाम भूमिका घ्यावी.
संघर्षग्रस्त भागात कार्यरत भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष धोरण तयार करण्यात यावे. परदेशात कार्यरत असलेला प्रत्येक भारतीय हा देशाचा प्रतिनिधी आहे. त्यांच्या सुरक्षेची आणि सन्मानाची जबाबदारी भारत सरकारची आहे. या तिन्ही भारतीयांच्या बलिदानाचा सन्मान करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.PUNE NEWS
यावेळी अक्षय जैन म्हणाले, “माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार जर एखाद्या परदेशी लष्करी कारवाईमुळे भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असेल, तर हा केवळ अपघाताचा विषय नसून देशाच्या स्वाभिमानाचा आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. जगातील कोणतीही महासत्ता भारतीयांच्या जीवाची किंमत कमी लेखू शकत नाही.”
PUNE NEWS




